Department Of Revenue Agrowon
ताज्या बातम्या

Revenue Department strike : महसूल विभागाचे कामकाज सोमवारपासून ठप्प होण्याची शक्यता

ग्रेड पे लागू करण्यात यावा, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाला पाठविण्यात आले आहे.

Team Agrowon

Amravati News नायब तहसीलदारांना राजपत्रित अधिकारी दर्जा असला तरी ग्रेड पे मात्र लागू करण्यात आलेला नाही. त्यांना राजपत्रित अधिकारी वर्ग २ चा ४८०० रुपये ग्रेड पे लागू करण्यात यावा, या मागणीसाठी तीन एप्रिलपासून तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेने बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे महसूल विभागातील (Revenue Department) कामकाज ठप्प पडण्याची शक्यता आहे.

ग्रेड पे लागू करण्यात यावा, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाला पाठविण्यात आले आहे. संघटना या मागणीसाठी वर्ष १९८८ पासून संघर्ष करीत असून सातत्याने पाठपुरावा करीत आहे.

मात्र शासनाने त्याची अद्यापही दखल घेतलेली नाही. बक्षी समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याचे आश्‍वासन देण्यात आले असले तरी ते पाळण्यात आलेले नाही. वारंवार आश्‍वासन पदरात पडत असून, ठोस कृती होत नसल्याने अधिकाऱ्यांमध्ये शासनाप्रती रोष निर्माण झाला आहे.

संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मागणीचे निवेदन शासनाला पुन्हा पाठविले असून, येत्या एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. हा अधिकारी वर्ग आंदोलनात सहभागी झाल्यास महसूल विभागाचे कामकाज ठप्प पडणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना संघटनेच्या जिल्हाध्यक्ष नीता लबडे, कार्याध्यक्ष वैभव फरतारे, वैशाली पाथरे, सचिव अशोक काळीवकर, उपाध्यक्ष अरविंद माळवे, एम. टी. धुळे, राजीव वानखडे, प्रवीण देशमुख, संजय मुरतकर, नरेंद्र कुरळकर, संध्या ठाकरे, श्याम देशमुख, विनोद वानखडे, प्रशांत देशमुख, प्रशांत अडसुळे यांच्यासह जिल्ह्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT