Rain Update Agrowo
ताज्या बातम्या

Rain Update : सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

२४ तासांत २३.७ मिलि पावसाची नोंद

टीम ॲग्रोवन

सातारा : जिल्ह्यात परतीचा (Heavy Rainfall) जोर कायम असल्याने पिकांच्या नुकसानीत (Crop Damage) वाढ होत आहे. जिल्ह्यात २४ तासांत सरासरी २३.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सुरू असलेला परतीचा पाऊस शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे.

शुक्रवारी (ता. १४) फलटण तालुक्याचा अपवाद वगळता इतर सर्व तालुक्यांत दमदार पाऊस झाला आहे. शुक्रवारी रात्री पावसाचे प्रमाण अधिक होते. विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

खंडाळा, माण, कोरेगाव या तालुक्यांतील ३५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतात पाणी साचले असल्याने पिके कुजत आहे. शेतात पाणी असल्याने सर्व कामे ठप्प आहेत. डोळ्यासमोर नुकसान होत असतानाही पिके काढता येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे.

तालुकानिहाय पाऊस मिलिमीटर

सातारा ः १३.४, जावळी ः २२.५, पाटण ः २७.५, कऱ्हाड ः १९.८, कोरेगाव ः ३९.७, खटाव ः २१.७, माण ः ४१.२, फलटण ः ५.७, खंडाळा ः ४४.२, वाई ः २३.६, महाबळेश्वर ः १७.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: तूर आवकेत घट, कांद्याचे दर टिकून, कोथिंबिरीच्या दरात घसरण, ढोबळी मिरचीच्या दरात चढ-उतार तर पपईचे भाव कायम

Farmer Training: सोयाबीन-कापूस व्यवस्थापनावर प्रशिक्षण

Sugarcane FRP: साखरेच्या दरवाढीचा कारखान्यांना फायदा नाही, ऊस दरावर तोडगा काढू- मंत्री हसन मुश्रीफ

Halad Kandmashi: हळदीवर कंदमाशीचा प्रादुर्भाव; कंदकुज रोखण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन

Climate Change Crisis: हवामान संकट अन् कृषी-अर्थव्यवस्था

SCROLL FOR NEXT