Sand Policy Agrowon
ताज्या बातम्या

Sand Policy Maharashtra : स्वस्तात वाळू देण्याची प्रक्रिया संथगतीने

Sand Policy Update राज्याच्या महसूल विभागाकडून स्वस्तात वाळूचे धोरण लागू कऱण्यात आले असले, तरी या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सोलापूर जिल्ह्यात अद्यापही धिम्या गतीनेच काम सुरु आहे.

Team Agrowon

Solapur News : राज्याच्या महसूल विभागाकडून स्वस्तात वाळूचे धोरण लागू कऱण्यात आले असले, तरी या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सोलापूर जिल्ह्यात अद्यापही धिम्या गतीनेच काम सुरु आहे.

अद्यापही यासाठी आवश्यक असणारय़ा घाटाचे सर्वेक्षण पूर्ण झालेले नाही. पण किमान ४० ठिकाणे निश्चित करण्यात येणार असून, येत्या ३० मे पर्यंत त्याचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक मे पासून या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ते स्वतःच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पण त्यांच्याच जिल्हयात प्रशासनाकडून मात्र निव्वळ वेळकाढूपणाचे धोरण घेतले जात असल्याचे दिसते.

नव्याने वाळूसाठी घाटाचे सर्वेक्षण करणे आणि त्याला पर्यावरण विभागाची मंजुरी घेणे, या सगळ्या प्रक्रियेमुळे मे महिन्यात ही वाळू सामान्यांच्या घरासाठी मिळेल, याबाबत शंका आहे.

पण तूर्ततरी वाट पाहण्याशिवाय लोकांना गत्यंतर नाही. दरम्यान, आता ४० ठिकाणे निश्चित केल्याचे आणि येत्या ३० मे पर्यंत त्यासंबंधीची सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT