Sharad Pawar Agrowon
ताज्या बातम्या

Sharad Pawar : शेतकऱ्यांच्या संधी उद्ध्वस्त करणे हेच सरकारचे धोरण

शेतीमालाला चांगला मोबदला मिळावा. शेतीसाठी पाणी मिळावे आणि बाजारपेठेची व्यवस्था यासाठी आम्ही काम केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठिंब्याने देशातील शेतीविषयक चित्र बदलले.

Team Agrowon

Nashik News शेतीमालाला चांगला मोबदला मिळावा. शेतीसाठी पाणी मिळावे आणि बाजारपेठेची (Agriculture Market) व्यवस्था यासाठी आम्ही काम केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठिंब्याने देशातील शेतीविषयक चित्र बदलले.

आता मात्र शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवण्याऐवजी त्यांच्या संधी उद्ध्वस्त करणे हे सरकारचे धोरण बनले आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली. तसेच शेतकरी विरोधी राजकर्त्यांना सत्तेपासून दूर ठेवावे लागेल, असे आवाहनही त्यांनी केले.

देवरगाव (ता. नाशिक) येथे रविवारी (ता. ९) आदिवासी आश्रमशाळा आणि मुलींच्या वसतिगृह इमारतीचे भूमिपूजन श्री. पवार यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, देवळालीच्या आमदार सरोज अहिरे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी खासदार देविदास पिंगळे, आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, ‘मविप्र'चे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, की आपण सर्वजण शेती करणारे लोक असलो तरी आज ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. नाशिक जिल्हा राज्यात उत्तम शेती करणारा जिल्हा असून या भागातून देशपातळीवर कांदा, द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो पाठवले जातात. या सगळ्याच्या मागे सरकार उभे राहिले आणि मदत केली तर माझी खात्री आहे की केवळ महाराष्ट्राची नाही तर देशाची गरज आपण भागवू आणि देशाच्या बाहेर शेतमाल पाठवू.

दुर्दैवाने ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांचे धोरण निर्यातीला नाही तर आयातीला प्रोत्साहन देणारे आहे, या शब्दात शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या शेतमाल आयात निर्यात धोरणावर टीका केली. हे धोरण बदलावे म्हणून शेतकरी हिताच्या विरुद्ध धोरण आखणारे जे राज्यकर्ते असतील त्यांना बाजूला करण्याचे काम आपल्याला करावे लागेल, असे आवाहन केले.

आमची श्रद्धा शेतकऱ्यांवर

शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली. आमची श्रद्धा शेतकऱ्यांसाठी आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्याचं पाणी कस पुसता येईल, कशी मदत करता येईल, त्यात आमची श्रद्धा आहे, असेही पवार म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raju Shetti: १२९ कारखान्यांकडे २ हजार कोटींची एफआरपी थकित, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे तक्रार

Soybean Farmers Protest: सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी, 'स्वाभिमानी'चे गडहिंग्लज प्रांत कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन

Special Agriculture Zone: कर्नाटकात शेती व्यतिरिक्त जमिनीच्या खरेदी-विक्री ला बंदी ; १ हजार ७७७ एकरवर विशेष कृषी क्षेत्राची निर्मिती  

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना महिन्याला २,१०० रुपये देऊ; एकनाथ शिंदेंची ग्वाही

Sugarcane Payment: मांजरा कारखान्याकडून २७५० रुपयांचा हप्ता जमा

SCROLL FOR NEXT