Rahul Gandhi  Agrowon
ताज्या बातम्या

Bharat Jodo Yatra : उद्योगपतींचे कर्ज माफ होते, पण शेतकऱ्यांचे होत नाही

मोदी सरकारकडून देशातील उद्योगपतींचे कर्ज दोन मिनिटांत माफ केले जाते. परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात नाही. ही शोकांतिका आहे. अशी टीका खासदार राहुल गांधी यांनी केली.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
हिंगोली ः मोदी सरकारकडून देशातील उद्योगपतींचे कर्ज दोन मिनिटांत माफ केले जाते. परंतु शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात नाही. ही शोकांतिका आहे. शेतात काबाडकष्ट करून पिकविलेल्या शेतीमालाला भाव मिळत नाही. त्यांच्या मनात भीती निर्माण केली जाते. जनतेला दबावाखाली ठेवण्याचे काम केले जात आहे. भीती पसरवून द्वेष वाढवायचा, द्वेष वाढला की हिंसा वाढवायची हा आरएसएस (RSS) आणि भाजपचा (BJP) अजेंडा आहे, अशी टीका खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली.

भारत जोडो यात्रेदरम्यान माळहिवरा (जि. हिंगोली) येथे सोमवारी (ता. १४) रात्री आयोजित पदयात्रेच्या चौक सभेत ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, भाऊराव पाटील गोरेगावकर आदींची उपस्थिती होती. राहुल गांधी म्हणाले, की शेतकरी शेतात घाम गाळतो परंतु शेतीमालाला भाव दिला जात नाही. चक्रीवादळ, अतिवृष्टी आदी नैसर्गिक संकटांमुळे पिकांचे नुकसान होते, परंतु पीकविमा भरपाई मिळत नाही. शेतकऱ्यांच्या खिशातून हजारो कोटी रुपये काढून खासगी विमा कंपन्यांना दिले जातात. पीक चांगले येते तेव्हा निर्यात बंद करून आयात केली जाते. अब्जाधीशांचे कोट्यवधींचे कर्ज माफ होते. परंतु शेतकऱ्यांचे होत नाही. उद्योजकांसाठी जीएसटी, नोटाबंदी केली. त्यामुळे लघू उद्योकांचे नुकसान झाले, असे ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dharashiv Farmer Story: सरकारच्या ५ हजारांच्या अग्रिम मदतीवरुन नाराजी, शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांना सोयाबीनची 'पट्टी'च केली मनी ऑर्डर

Integrated Farming: एकात्मिक शेती दुष्काळात फायदेशीर ठरेल : कुलगुरू खर्चे

Agriculture Irrigation Challenges: मोटारपंप बंदीच्या निर्देशांमुळे नवे संकट : किशोर वडेट्टीवार

Farmers Issue: कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या हाती भोपळा : खासदार अमर काळे

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांची चेष्टा होणार नाही, 'एनडीआरएफ'कडूनही मदत मिळेल- बावनकुळे

SCROLL FOR NEXT