Moh Phul Agrowon
ताज्या बातम्या

Moh Phul : मेळघाटात दरवळतोय मोहाच्या फुलांचा सुगंध

मेळघाटात मोठ्या प्रमाणातील मोहफुलांच्या झाडांना फुले लागली आहेत. त्याचा सुगंध आसमंतात दरवळू लागला आहे. ही मोहफुले मेळघाटात आदिवासींसाठी रोजगाराचे साधन बनली आहेत.

Team Agrowon

Amaravati News : मेळघाटात मोठ्या प्रमाणातील मोहफुलांच्या (Moh Phul) झाडांना फुले लागली आहेत. त्याचा सुगंध आसमंतात दरवळू लागला आहे. ही मोहफुले मेळघाटात आदिवासींसाठी (Tribal) रोजगाराचे (Employment) साधन बनली आहेत.

त्यावर आदिवासींच्या दैनंदिन जीवनातील अनेक घडामोडी अवलंबून आहेत. १५ मार्चपासून मोहफुलांच्या गळतीला सुरुवात झाली आहे. फुले गोळा करण्यासाठी पहाटे रानावनातील मोहाच्या झाडांखाली आबालवृद्धांची गर्दी होत आहे.

साधारण मार्च-एप्रिलपासून मोहफुलांच्या गळतीला सुरुवात होते. पहाटे तीन-साडेतीन वाजेपासून सकाळी सातवाजेपर्यंत ही गळती सुरू राहते. त्यामुळे पहाटेपासूनच आदिवासी या झाडांखाली थांबून मोहफुले गोळा करतात.

वेचून आणलेली फुले घरावर वाळू घातली जातात. वाळलेली मोहफुले बाजारात विकून आदिवासी उदरनिर्वाह चालवितात. शिवाय काही मोहफुले घरात वर्षभर सांभाळून ठेवली जातात. या फुलांपासून काही जण दारू काढून सणासुदीला ती प्राशन करतात.

आदिवासींसाठी बहुगुणी मोहफुले

मोहफुले बाजारात विकून आदिवासींना पैसे मिळतात. या फुलांपासून दारू पण काढली जाते. त्यातूनही उत्पन्न मिळते. फुलांचा हंगाम संपला, की या झाडांना फळे येतात. ही फळे खाण्यासाठी वापरली जातात.

त्यातील आठोळीतील गरापासून तेल काढले जाते. हे तेल औषधीयुक्त असून, आदिवासी त्याचा खाण्यासाठी उपयोग करतात. गुरांच्या विविध आजारांवर मोहाच्या फुलातील हा गर औषधी म्हणून वापरला जातो. मोहाच्या या फळाला टोळ म्हणतात.

मेळघाटात वृक्ष लागवड आवश्यक

अलीकडच्या काळात वृक्षतोड होत असल्याने मोहाच्या झाडांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने मोहाच्या झाडांची रोपे तयार करून त्यांचे मेळघाटात रोपण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pragati Award: देवगिरकरांना ‘प्रगती’ पुरस्कार जाहीर; आज वितरण

Fertilizer Management: माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन गरजेचे : डॉ. सुरवसे

Farm Road: पूर्वीचा शेतरस्ता असेल तर नवीन रस्त्याला मंजुरी मिळणार नाही, राज्य सरकारचा निर्णय

Wheat Export India : २५ लाख टन गहू निर्यातीला मंजुरी; शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय, केंद्र सरकारचा दावा

Mulberry Cultivation Registration: मराठवाड्यात ३५४७ एकरांवर तुती नोंदणी

SCROLL FOR NEXT