Rohit Pawar News  Agrowon
ताज्या बातम्या

Rohit Pawar: सत्ताबदलाचा परिणाम निधीवर नाही, श्रेयवादावर होईल

‘‘कर्जत-जामखेडसाठी मागील दहा वर्षांत जेवढा निधी (Fund) आला नाही, तेवढा निधी केवळ आपण आमदार झाल्यानंतर तालुक्याला मिळाला आहे. जिथे गरज आहे, तिथेच आणि विविध योजनांवर अभ्यास करून आपण तो मिळविला आहे.

Team Agrowon

नगर : ‘‘विधानसभा निवडणुकीनंतर आज अखेर केवळ जनतेच्या मनात आणि जनतेला बरोबर घेऊन कामकाज केले आहे. यापुढेही ते असेच सुरू राहील. सत्ता येते, जाते. त्यामुळे सत्ताबदलाचा परिणाम मतदारसंघाच्या निधीवर (Fund) नक्कीच होणार नाही. झालाच तर तो श्रेयवादावर होईल,’’ असे मत आमदार रोहित पवार (Rohit Pawar News) यांनी व्यक्त केले.

कर्जत तालुक्यातील भीमा नदीकाठावरील गावांमध्ये आयोजित विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण कार्यक्रमाच्या दौऱ्यादरम्यान पवार बोलत होते.

पवार म्हणाले, ‘‘कर्जत-जामखेडसाठी मागील दहा वर्षांत जेवढा निधी आला नाही, तेवढा निधी केवळ आपण आमदार झाल्यानंतर तालुक्याला मिळाला आहे. जिथे गरज आहे, तिथेच आणि विविध योजनांवर अभ्यास करून आपण तो मिळविला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांचेच उमेदवार जिंकतील. कोणत्याही परिस्थितीत निष्ठावंतांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न या निवडणुकीत करणार आहे.’’

‘आदिनाथ’ सुरू करणारच

‘‘करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना (Sugar Factory) चालू केल्यास त्या परिसरातील इतर कारखान्यांना ऊस कमी पडेल, या भीतीने तेथे आकसाचे राजकारण सुरू आहे. मात्र, त्याबाबतची न्यायालयीन लढाई आपण जिंकलेली आहे. कारखाना सुरू केल्यानंतर कर्जत-जामखेडमधील सभासद, कारखाना परिसरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सुबत्तेसाठी सर्वतोपरी प्रयत्न राहील,’’ अशी ग्वाही पवार यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT