Gulabi Bondali  Agrowon
ताज्या बातम्या

Cotton Crop : कापूस उत्पादकांसमोर आता बोंड अळीचे संकट

Gulabi Bondali : पावसाने खंड दिल्याने हवालदील झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता गुलाबी बोंड अळीचे संकट उभे ठाकले आहे.

Team Agrowon

Vardha News : पावसाने खंड दिल्याने हवालदील झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता गुलाबी बोंड अळीचे संकट उभे ठाकले आहे. वर्धा, देवळी, हिंगणघाट या तालुक्ं‍यात प्रादुर्भाव दिसून आल्याने पीक हातचे गमावण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. दुसरीकडे कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी मात्र प्रादुर्भाव नियंत्रणात राहण्याची शक्‍यता वर्तवीत शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

कपाशी उत्पादक म्हणून वर्धा जिल्ह्याची ओळख आहे. हिंगणघाट तालुक्‍यात कापसावर आधारीत प्रक्रिया उद्योग, जीनिंग व्यवसाय देखील यामुळेच वाढीस लागले आहेत. यंदा सुमारे २ लाख १९ हजार ३२ हेक्‍टरवर कपाशीची लागवड करण्यात आली आहे.

गेल्या दोन वर्षांपूर्वी बोंड अळीच्या परिणामी शेतकऱ्यांवर हे पीक गमावण्याची वेळ आली होती. यंदा पुन्हा गुलाबी बोंड अळीने डोके वर काढल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्धा, हिंगणघाट, देवळी या तालुक्यात काही गावांमध्ये हा प्रादुर्भाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्या पार्श्‍वभूमीवर केव्हीके सेलसुरा तज्ज्ञांनी केळापूर, पवनार या भागांत पीक पाहणी केली.

यावेळी धुऱ्यापासून काही अंतरावरील झाडांवर प्रादुर्भाव आढळून आला. विशेष म्हणजे या पाहणीत ३५ टक्‍के बोंडीवर प्रादुर्भाव आढळून आला आहे. या पार्श्‍वभूमीवर एकरी दोन किंवा त्यापेक्षा अधिक कामगंध सापळे लावण्याचे आवाहन केव्हीके प्रमुख डॉ. जीवन कतोरे यांनी केले. यामध्ये नर पतंग किती आढळतात यावरून प्रादुर्भावाची स्थिती लक्षात येते. तसेच अळीला पोषक वातावरण राहिल्याचे ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT