Wet Drought Agrowon
ताज्या बातम्या

Wet Drought : सर्वत्र ओल्या दुष्काळाची भयाण स्थिती

सलग तीन दिवस अतिवृष्टीच्या तडाख्यात खरीप हंगामातील अंतिम टप्प्यातील कष्टाने उभी केलेली पिके मातीमोल झाली आहेत.

टीम ॲग्रोवन

नाशिक : सलग तीन दिवस अतिवृष्टीच्या (Wet Drought) तडाख्यात खरीप हंगामातील (Kharip Season) अंतिम टप्प्यातील कष्टाने उभी केलेली पिके मातीमोल (Crop Damage) झाली आहेत. सोंगणीविना शिल्लक असलेली पिके पाण्यात तर सोंगणी केलेले सोयाबीन, मका, बाजरी ही पिके पाण्यावर तरंगत असल्याची भीषण स्थिती आहे. ऐन दिवाळीत जिल्ह्यात सर्वत्र ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

परतीचा पाऊस फक्त शेतकऱ्यांनाच नाही, तर व्यवसायिकांना अडचणीत आणणारा ठरला आहे. त्यामुळे सर्वत्र फक्त नुकसानच ऐकायला मिळत आहे. येवल्यात गुरुवारी (ता. २०) झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे पिकांसह शिवरांची दैना झालीच. ग्रामीण व नागरी भागातही पावसाने मोठे हानी केली.

जिल्ह्यात सद्यःस्थितीत येवला, नांदगाव, मालेगाव, सटाणा, दिंडोरी, कळवण, सुरगाणा, पेठ, त्रंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर, नाशिक, चांदवड अशा सर्व तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा मोठा फटका बसलेला आहे. अनेक भागात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे पीक होत्याचे नव्हते झाल्याची परिस्थिती आहे. संततधर पावसामुळे थोड्याफार प्रमाणात काहीतरी खरिपातील पिके हातात येतील, अशी शेतकऱ्यांना आशा होती; मात्र गेल्या दोन-तीन दिवसांच्या पावसाने सर्व शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरवले आहे. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला आहे.

दोन-तीन दिवसांपासून पाऊस रोज हजेरी लावत आहे. शेतात उभा असलेला मका, बाजरी व सोयाबीन काढता येत नाही. कापूस पावसात भिजून काळवंडला आहे. अनेक ठिकाणी संपूर्ण शेतच पाण्याने उपळल्याने उभी पिके सडत आहेत. यामुळे मोठे नुकसान झाले. दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाने शेतकरी वर्गाच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

...असे आहे नुकसान

खरिपातील सोयाबीन, मका, बाजरी, कापूस पिकाचे नुकसान

टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, मिरची ही पिके रोगांच्या विळख्यात. द्राक्ष छाटणी अडचणीत; घड जिरण्यासह गोळी घड निघण्याची समस्या

डाळिंब पिकांवर प्लेगजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढता

खरीप कांदा लागवडी बाधित; लेट खरीप रोपे खराब तर उन्हाळ कांद्याच्या रोपवाटिकांचे नुकसान

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT