ताज्या बातम्या

Soybean Crop : दहा एकरांवरील सोयाबीनला लागल्या नाहीत शेंगा

यंदाच्या (२०२२) खरीप हंगामात १० एकर क्षेत्रावर पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाला शेंगा लागल्या नाहीत.

टीम ॲग्रोवन

परभणी ः यंदाच्या (२०२२) खरीप हंगामात (Khareef Season)१० एकर क्षेत्रावर पेरणी केलेल्या सोयाबीन पिकाला शेंगा लागल्या नाहीत. त्यामुळे या बियाणे कंपनी(Seed Company) विरुद्ध कारवाई करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी

जवळा झुटा (ता. पाथरी) येथील एका शेतकऱ्यांनी पाथरी पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांकडे यांच्याकडे मंगळवारी (ता. २७) केली आहे.

या संदर्भात जवळा झुटा (ता. पाथरी) येथील शेतकरी राजेंद्र सुरेशराव जवळेकर यांनी निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.

जवळेकर यांनी पाथरी येथील एका कृषी सेवा केंद्रावरून एका खासगी कंपनीचे सोयाबीनच्या बियाण्याच्या १० बॅग खरेदी केल्या. जून महिन्यात जवळा झुटा येथील गट क्रमांक १९ मधील १० एकर जमिनीवर सोयाबीनची पेरणी केली.

सोयाबीन पीकाची फक्त वाढ झालेली आहे. परंतु तीन महिन्याचा कालावधी उलटला तरी अद्यापही सोयाबीन पिकाला शेंगा लागलेल्या नाहीत. या पिकाची पाहणी करून संबंधित कंपनी विरुद्ध कार्यवाही करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी जवळेकर यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT