Chana Rate
Chana Rate Agrowon
ताज्या बातम्या

Chana Procurement : सात जिल्ह्यांत हरभरा खरेदीचे उद्दिष्ट वाढविले

Team Agrowon

Akola News राज्यात या हंगामात सुरू असलेली हमीभावातील हरभरा खरेदी (Chana MSP Procurement) काही जिल्ह्यांत उद्दिष्ट पूर्ण झाल्याने बंद पडलेली आहे. बाजारात दर हमीभावाच्या आत असल्याने नोंदणी केलेल्या हजारो शेतकऱ्यांसमोर हरभरा विक्रीचा पेच तयार झाला आहे.

शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करीत शासनाने राज्यातील अकोल्यासह सात जिल्ह्यांत हरभरा खरेदीचे उद्दिष्ट वाढवून दिले आहे. या जिल्ह्यात लवकरच हरभरा खरेदी (Chana Procurement) पूर्ववत करण्याची तयारी सुरू झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ५ हजार ३३५ रुपये या हमीभावाने हरभऱ्याची खरेदी केली जात आहे. ‘नाफेड’द्वारे स्टेट नोडल एजन्सी ही खरेदीची प्रक्रिया राबवत आहेत. राज्यात सर्वांत आधी बुलडाणा जिल्ह्यातील खरेदी उद्दिष्ट पूर्ण झाल्याच्या कारणाने बंद करण्यात आली.

त्यानंतर अकोला व इतर जिल्ह्यांत अशीच परिस्थिती उद्‍भवली. परिणामी, या जिल्ह्यांमध्ये हरभरा विक्री राहिलेल्या शेतकऱ्यांत असंतोषाचे वातावरण बनले होते. याबाबत ‘ॲग्रोवन’ने वारंवार वस्तुस्थिती मांडत हरभरा खरेदीला वाचा फोडली होती.

खरेदी बंद असलेल्या जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी, शेतकरी प्रतिनिधींनी तातडीने हमीभाव खरेदी पूर्ववत करण्याची मागणी शासनाकडे केली.

याची दखल घेत गुरुवारी (ता. २७) उशिरा या खरेदीसाठी उद्दिष्ट वाढवून दिल्याचा आदेश काढण्यात आला. यंदा राज्याने प्रस्तावित केलेल्या ९.०९ लाख टन उद्दिष्टाऐवजी केंद्र शासनाने ८.१० लाख टन हरभरा खरेदीचे उद्दिष्ट दिले होते. उत्पादनाच्या २५ टक्के प्रमाणात ही खरेदी केली जात आहे.

वाढवून मिळालेले जिल्हानिहाय उद्दिष्ट (क्विंटल)

अकोला...९१ हजार ९१४

बुलडाणा...१ लाख ४७ हजार २९६

अमरावती...१ लाख १६ हजार ३६३

हिंगोली...९५ हजार ९८५

जालना...८१ हजार ५१

वाशीम...५४ हजार ६६

यवतमाळ १ लाख ५ हजार ९७९

अनावश्‍यक स्पर्धा केल्याचा ठपका

राज्य शासनाने नियुक्त केलेल्या स्टेट नोडल एजन्सींनी हरभरा खरेदीमध्ये अनावश्‍यक स्पर्धा करून जास्तीचे संदेश सोडत अपेक्षेपेक्षा जास्त खरेदी केली. यामुळे बुलडाणा, अमरावती, अकोला या जिल्ह्यांचे २५ टक्के प्रमाणातील खरेदीचे उद्दिष्ट वेळेआधीच संपविण्यात आले, असा ठपका शासनाच्या या आदेशात ठेवण्यात आला आहे.

नव्याने दिलेल्या सूचना

- सीमांतिक व कोरडवाहू शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन दररोज २५ क्विंटल प्रतिशेतकरी हरभरा खरेदी करावा

- एका सातबारावर कमाल १०० क्विंटल खरेदीची मर्यादा

- शनिवार, रविवार व सार्वजनिक सुटीच्या दिवशी खरेदी बंद

- दररोज आवश्‍यकतेनुसार कमीत कमी शेतकऱ्यांना संदेश द्यावेत

- नव्याने संदेश देण्यापूर्वी त्यापूर्वी संदेश दिलेल्या शेतकऱ्यांकडून प्राधान्याने हरभरा खरेदी करावा

- पावसात हरभरा न भिजण्याची काळजी एजन्सीने घ्यावी

- एजन्सीने उद्दिष्टापेक्षा जास्त खरेदी करू नये

राज्यातील खरेदीची आकडेवारी

कार्यान्वित केंद्र...६१०

नोंदणीकृत शेतकरी...५ लाख ८२ हजार ८२८

हरभरा खरेदी...५७ लाख ४४ हजार ७७८ क्विंटल

लाभार्थी शेतकरी...२ लाख ९० हजार ७०२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer As Life Partner : आदर्शवत विवाहसोहळा

Poultry Disease : उन्हामुळे कुक्कुटपालनात मरतुकीचे प्रमाण वाढले

Sugar Commissionerate : साखर उपपदार्थ विभागाची सूत्रे देशमुख यांनी स्वीकारली

Loksabha Election 2024 : खडकवासला मतदार संघातील मतदान केंद्रांना साहित्याचे वितरण

Sugar Export Ban : साखर निर्यातबंदीमुळे ऊस उत्पादकांच्या स्वप्नांची माती

SCROLL FOR NEXT