Bribe Agrowon
ताज्या बातम्या

Bribe News : लाचेप्रकरणी तलाठी महिलेस चार वर्षांचा तुरुंगवास

Jailed For Bribery Case : वारसपत्रानुसार नोंद झालेल्या वडिलोपार्जित शेतजमिनीचे ‘८ अ’ खाते वेगवेगळे करून देण्यासाठी तीन हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी तलाठी महिलेला चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.

Team Agrowon

Nagar News : वारसपत्रानुसार नोंद झालेल्या वडिलोपार्जित शेतजमिनीचे ‘८ अ’ खाते वेगवेगळे करून देण्यासाठी तीन हजार रुपये लाच घेतल्याप्रकरणी तलाठी महिलेला चार वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. याशिवाय दहा हजार रुपयांचा दंड ही करण्यात आला आहे. दंड न भरल्यास तीन महिन्यांची शिक्षा भोगावी लागणार आहे.

पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर पांगुळ येथील शुभांगी ससाने या तलाठी म्हणून काम करत होत्या. २०१६ मध्ये पांडुरंग ज्ञानदेव बडे (रा. चिंचपूर पांगुळ) यांचे वडील ११ वर्षांपूर्वी मयत झाले होते. त्यांच्या नावे चिंचपूर पांगूळ गावातील शेत जमीन वारस पत्रानुसार तक्रारदार व त्यांच्या भावाच्या नावे वारस पत्रानुसार झालेली होती.

त्याची ७/१२ वर नोंद घेण्यात आलेली होती. परंतु त्याचे ‘८ अ’ खाते वेगळे करून देण्यासाठी ससाने यांनी दहा हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीतून तीन हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने त्यांना पकडले. त्यानंतर पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला.

सरकारी पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर झालेल्या अंतिम सुनावणीत तलाठी महिलेला जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. ए. बरालिया यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ चे कलम ७, १३, (१),(ड) सह १३ नुसार ४ वर्षे सक्त मजुरी व १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ३ महिने कैदेची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील मंगेश वसंतराव दिवाणे यांनी काम पाहिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT