Department Of Revenue Agrowon
ताज्या बातम्या

Department of Revenue : चिखली, खामगावात उभारणार तलाठी आणि मंडल कार्यालये

जिल्ह्यातील खामगाव आणि चिखली तालुक्यांतील महसूल विभागांतर्गत येणाऱ्या मंडल अधिकारी आणि तलाठी कार्यालये नव्याने बांधण्यात येणार आहेत.

Team Agrowon

बुलडाणा : जिल्ह्यातील खामगाव आणि चिखली तालुक्यांतील महसूल विभागांतर्गत (Department of Revenue) येणाऱ्या मंडल अधिकारी आणि तलाठी कार्यालये नव्याने बांधण्यात येणार आहेत. महसूल व वन विभागाच्या (Revenue And Forest Department) शासन निर्णयानुसार ३४ कोटी ५५ लाख रुपयांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhao) यांनी दिली.

ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य लोकांची कामे ही तलाठी कार्यालयांशी संबंधित असतात. परंतु जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांची कार्यालये आजही भाड्याच्या जागेत आहेत. अनेक वेळा कार्यालयांची जागा बदलली जाते. महसूल विभागांतर्गत येणारे तलाठी यांचे कार्यालय गावातच एका ठिकाणी स्थायिक स्वरूपात असावे.

सोबतच मंडल अधिकाऱ्यांचीही कार्यालय त्यांच्या मंडल स्तरावर असावी या दृष्टिकोनातून जाधव यांनी शासनाकडे मागणी केली होती. या मागणीला यश आले असून चिखली तालुक्यातील १० मंडल अधिकारी, ५० तलाठी कार्यालये तर खामगाव तालुक्यात ५३ तलाठी कार्यालये आणि १२ मंडलाधिकारी कार्यालये बांधण्यात येतील.

या व्यतिरिक्त‍ मेहकर तालुक्यातील ५० तलाठी कार्यालये, जळगाव जामोद तालुक्यातील ३० तलाठी कार्यालये आणि पाच मंडल अधिकारी कार्यालये, संग्रामपूर तालुक्यातील ३० तलाठी कार्यालये आणि ५ मंडल कार्यालये बांधकामासंदर्भातील प्रस्तावही शासनाकडे पाठवण्यात आले होते. यासाठी३८ कोटी ७७ लाख रुपये निधी शासन निर्णयद्वारे मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील तलाठी आणि मंडल अधिकारी यांना हक्काचे कार्यालय मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT