Sugar Factory Agrowon
ताज्या बातम्या

Sugar Factory : ‘साखर कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करा’

शासन निर्णयानुसार साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी ऊसदर जाहीर करणे बंधनकारक आहे.

टीम अॅग्रोवन.

कऱ्हाड, जि. सातारा ः शासन निर्णयानुसार साखर कारखान्यांनी (Sugar Factory) गळीत हंगाम सुरू करण्यापूर्वी ऊसदर (SugarCane) जाहीर करणे बंधनकारक आहे. सातार जिल्ह्यातील कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू होऊन १५ दिवस झाले तरीही कऱ्हाड तालुक्यातील रयत अथणी वगळता इतर कारखान्यांनी ऊसदर जाहीर केलेला नाही.

ऊसदर जाहीर न करून शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या साखर कारखान्यावर येत्या तीन दिवसांत योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे यांनी साखर आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनातील माहिती अशी, की सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आपला गळीत हंगाम सुरू करून १५ दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. परंतु जिल्ह्यातील रयत अथणी शुगर हा कारखाना वगळता इतर कुणीही आपला दर जाहीर केलेला नाही. रयत क्रांती संघटना व ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने ऊस दर जाहीर न करून शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या साखर कारखान्यावर येत्या दोन ते तीन दिवसांत योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.

अन्यथा आम्ही आंदोलनाचा मार्ग स्वीकारणार आहोत. आपणाकडून जर कायदेशीर कारवाई झाली नाहीतर आम्‍ही न्यायालयामध्‍ये शेतकऱ्यांची संगनमताने फसवणूक झाली आहे, अशी याचिका दाखल करणार आहोत. तरी लवकरात लवकर जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ऊसदर जाहीर करण्याचे आदेश द्यावेत.

चालू वर्षीच्या गळीत हंगामातील साखर उताऱ्यानुसार दर देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेतला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या तोट्याचा तर कारखांदारांच्या फायद्याचा आहे. कारण चालू वर्षी किती साखर उतारा मिळणार हे हंगाम संपल्याशिवाय कळणार नाही. त्यामुळे कोणता कारखान्याचा ऊस दर किती मिळणार हे समजणार नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Center Closure: आळेफाट्यात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रे बंद

Agriculture Drone: ड्रोनची उड्डाण वाढू लागली

Sunetra Pawar Chairperson: माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार

Cotton Picking Labour Shortage: कापूस वेचणीसाठी मजूरटंचाई

MPKV Rahuri Convocation: महात्मा फुले कृषी विद्यापीठात उद्या पदवीप्रदान समारंभ

SCROLL FOR NEXT