Banana CMV Agrowon
ताज्या बातम्या

Banana CMV : केळीवरील ‘सीएमव्ही’बाबत नुकसानीचे पंचनामे पूर्ण

कुकुंबर मोझियाक व्हायरस अर्थात सीएमव्ही रोगामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले होते.

टीम ॲग्रोवन

जळगाव ः कुकुंबर मोझियाक व्हायरस (Banana CMV Disease) अर्थात सीएमव्ही रोगामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादकांचे (Banana Producer) मोठे नुकसान (Banana Crop Damage) झाले होते. यासंबंधी नुकसानीचे पंचनामे (Banana Crop Damage Survey) करण्यात आले असून, लवकरच या शेतकऱ्यांना भरपाई (Banana Crop Damage Compensation) मिळणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी ५८ कोटी रुपयांच्या तरतुदीचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून, मिळणार आहे.

जिल्ह्यातील प्रमुख पीक असणाऱ्या केळीवर सध्या कुकुंबर मोझियाक व्हायरस, अर्थात सीएमव्ही या रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. हा रोग झाल्यानंतर संपूर्ण शेतातील पीकच काढून फेकावे लागते. हा रोग संसर्गजन्य असून, केळी उत्पादक धास्तावले आहेत. मुख्यमंत्री शिंदे जळगाव जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांच्याकडे केळी उत्पादकांची व्यथा मांडण्यात आली होती.

मुख्यमंत्र्यांनी सीएमव्हीग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याची ग्वाही दिली होती. या अनुषंगाने २१ सप्टेंबरला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सीएमव्हीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ११ रुपये प्रतिरोप या सवलतीच्या दरात टिश्युकल्चर रोपे उपलब्ध करण्यात येतील, असा निर्णयदेखील घेण्यात आला होता. या समस्येबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार उन्मेष पाटील, रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत पाटील आदींनी शासन, प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.

१५ हजारांवर शेतकऱ्यांचे नुकसान

दरम्यान, यानंतर करण्यात आलेल्या पाहणीत जिल्ह्यातील २७५ गावांमधील १५ हजार ६६३ शेतकऱ्यांना सीएमव्ही रोगाचा फटका बसल्याचे दिसून आले. यामुळे एकूण आठ हजार ७७१ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे. यात एकूण ११ रुपये प्रतिरोप या मूल्यानुसार तीन कोटी ८९ लाख ७७ हजार ६५७ रोपांचे एकूण ४२ कोटी ८९ लाख ५४ हजार २३१ रुपये इतके अनुदान देय आहे, तर १५ रुपयांच्या सरासरी दरानुसार याचे मूल्य ५८ कोटी ४६ लाख ६४ हजार ८५५ रुपये इतके अनुदान देय आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT