Nashik News Agrowon
ताज्या बातम्या

Surat-Chennai Expressway : सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड प्रकल्पबाधितांचा धडक मोर्चा

Surat Chennai Greenfield : निफाड तालुक्यातील सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड प्रकल्पबाधित संघर्ष समितीतर्फे शेतकऱ्यांनी माजी आमदार अनिल कदम यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. ११) निफाड प्रांत कार्यालयावर विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा काढला.

Team Agrowon

Nashik News : निफाड तालुक्यातील सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड प्रकल्पबाधित संघर्ष समितीतर्फे शेतकऱ्यांनी माजी आमदार अनिल कदम यांच्या उपस्थितीत सोमवारी (ता. ११) निफाड प्रांत कार्यालयावर विविध मागण्यांसाठी धडक मोर्चा काढला.

जळगाव फाटा येथून मोर्चास प्रारंभ झाला. शासकीय विश्रामगृहामार्गे प्रांत कार्यालयावर मोर्चा धडकला. ‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’, ‘प्रतिएकरी दोन कोटी भरपाई द्यावी’, ‘चुकीचे निकाली काढलेले दावे रद्द करा’, अशा घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या. प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारावर प्रांताधिकारी हेमांगी पाटील मोर्चास सामोऱ्या गेल्या.

माजी आमदार कदम व शेतकऱ्यांनी प्रांत हेमांगी पाटील यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना शासनदरबारी पोहोचविण्याचे आश्वासन दिले. चांदोरीचे संदीप टर्ले, करंजगावचे खंडू बोडके-पाटील, दारणा सांगवीचे सरपंच कांतिलाल बोडके, ॲड. प्रकाश शिंदे, विनायक कांडेकर यांनी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या व्यथा प्रांत हेमांगी पाटील यांच्यासमोर मांडल्या.

माजी आमदार कदम यांनी  मोर्चेकरांसमक्ष महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व पालकमंत्री दादासाहेब भुसे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. त्याबाबत लवकरच मंत्री महोदयांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन पालकमंत्री भुसे यांनी दिले.

मोर्चात शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड, बाजार समिती संचालक गोकुळ गिते, भगवान सानप, हिरालाल सानप, किरण सानप, बाळू बोडके, बापू सानप, अशोक शिंदे, रावसाहेब गोहाड, न्यानेश्वर खाडे, गोविंद शिंदे, एकनाथ शिंदे, महेश घोलप, विक्रम सानप, सोमनाथ वडघुले, परवेझ शेख, शिवाजी सानप, विश्वास सानप, विलास हांडगे, किरण पिंगळे, विनायक कांडेकर, रोशन शिंदे यांच्यासह चेहडी, वरेदारणा, लालपाडी, दारणासांगवी, चाटोरी, सावळी, निपाणी पिंपळगाव, तळवाडे, बेरवाडी येथील शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Flight Tickets Prices : सोलापूरहून मुंबई, गोवा विमान प्रवासाचे तिकीट दर जाहीर

Ballot Paper Petition : ‘बॅलेट पेपर’बाबतची याचिका फेटाळली

Mango Production : सातपुड्यात आंब्यांच्या चांगल्या उत्पादनाची अपेक्षा

Maharashtra Politics : फडणवीस यांच्या नावाची घोषणा लांबल्याने समर्थकांत अस्वस्थता

Co-Generation Subsidy : सात कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पांना अनुदान नाकारले

SCROLL FOR NEXT