Onion Cultivation Agrowon
ताज्या बातम्या

Onion Cultivation : निफाड तालुक्यात उन्हाळ कांदा लागवड सुरू

शेतकऱ्यांचा एकरी मजुरी खर्च पोहोचला ११ हजारांवर

Team Agrowon

ताळे : निफाड तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामाला जोरदार सुरवात झाली आहे. शेतकऱ्यांना जादाच आर्थिक फायदा करून देणारे कांदा व मका या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर असून उर्वरित क्षेत्रामध्ये गव्हाची लागवड होत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रांगड्या कांद्याची कमी लागवड केली असली तरी उन्हाळ कांद्याच्या रोपवाटिकेनुसार उन्हाळ कांद्याची लागवड ही मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र उन्हाळ कांदालागवड सुरू आहे.

निफाड तालुक्यात प्रामुख्याने द्राक्ष, कांदा, ऊस, मका व गहू अशी नगदी पिके रब्बी हंगामात घेतली जातात. या सर्व पिकांचा लागवडीचा हंगाम सुरू असून त्यांच्या कामांना सर्वत्र गती मिळत आहे. भांडवलाअभावी अनेक शेतकऱ्यांनी या वर्षी उन्हाळ कांदा लागवडीऐवजी मका लागवड केली आहे.

गेल्या वर्षीच्या उन्हाळ कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. कांद्याच्या भावाबाबत केंद्र व राज्यातील सरकार लक्ष देत नाही ही बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आली आहे. म्हणून शेतकऱ्याला जादाचा आर्थिक फायदा करून देणारे पीक म्हणून मकाकडे बघितले जात आहे. शेतकऱ्याने आपल्या जमिनीची मशागत केली असली तरी जमीन कांदा लागवड योग्य होण्यासाठी त्यावर रोटर फिरवावा लागतो. जमीन भुसभुशीत झाल्यानंतर वाफे तयार करण्यासाठी ट्रॅक्टर किंवा बैलांच्या यंत्रांचा उपयोग केला जातो. वाफे माती लावून योग्य करण्यासाठी एकरी अडीच ते तीन हजार रुपये मजुरांना द्यावे लागत आहेत.

कांद्यासाठी उसनवारी

दरवर्षीच कांदा उत्पादक शेतकरी उसनवारी करून व दागदागिने बँकेत तारण ठेवून त्यावर पैसे मिळवून कांदा शेतीला भांडवल लावतात. हे सर्व करत असताना कांदा काढणीनंतर कांद्याला भाव चांगला मिळाला तर ठीक आहेत..नाहीतर शेतकऱ्यांच्या नशिबी पश्चात्तापच.! असे असले तरी येथील शेतकरी हे अपेक्षाच ओझं उराशी बाळगून उन्हाळ कांद्याची लागवड करत आहे. आताच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना कांदा लागवडीसाठी एकरी ११ हजार रुपये मजुरीचा खर्च द्यावा लागत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT