Ethanol Production Agrowon
ताज्या बातम्या

Ethanol Production : इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यांनी पुढे यावे

इथेनॉल हे भविष्यातील इंधन आहे. साखर कारखान्यांनी उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीसाठी पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

Team Agrowon

आष्टा, जि. सांगली ः इथेनॉल हे भविष्यातील इंधन (Ethanol) आहे. साखर कारखान्यांनी उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीसाठी (Ethanol Production) पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले.

आष्टा येथे पेठ सांगली हा ४१.२५ किलोमीथरचा मार्ग आहे. त्यासाठी ८६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजन, कोनशीला अनावरण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार धैर्यशील माने, संजय पाटील, आमदार जयंत पाटील, सुधीर गाडगीळ, विश्वजित कदम, विक्रम सावंत, मानसिंग नाईक, सुमन पाटील, गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांच्या उपस्थितीत झाले.

नितीन गडकरी म्हणाले, की पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखान्यांचे जाळे मोठे आहे. केवळ साखर उत्पादन करून आता चालणार नाही. उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर भर देताना हायड्रोजन निर्मितीसाठी कारखान्यांनी पुढे आले पाहिजे.

इथेनॉल, हायड्रोजन निर्मितीसाठी उसाच्या रसाची साठवणूक करून त्यावर वर्षभर प्रक्रिया करता येईल. केंद्र सरकार आता उस तोडणी यंत्रासाठी तीस लाख रुपयांचे अनुदान देणार आहे.

जैविक इंधन निर्मितीसाठी सरकारने हा पूरक निर्णय घेतला आहे. शिवाय तोडणी यंत्र हायड्रोजनवर कसे चालेल, याचाही अभ्यास सुरू आहे.

ते म्हणाले, की पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पडीक, नापीक जमीन आहे. या जमिनीत विविध प्रकल्पांची उभारणी झाली तर या भागातील रस्त्यांचा फायदा मोठ्या प्रमाणात होईल.

हायड्रोजन निर्मितीसाठी शेतकऱ्यांनीही वैयक्तिक पातळीवर पुढे आले तर तोही उत्पन्नाचा चांगला मार्ग होऊ शकतो.

पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले, की जिल्ह्यातील सर्वांनी या रस्त्यासाठी प्रयत्न केले. गडकरी यांनी सांगली जिल्ह्याला भरभरून निधी दिला आहे. खासदार धैर्यशील माने, खासदार संजय पाटील, आमदार जयंत पाटील यांची भाषणे झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT