Agriculture Department Agrowon
ताज्या बातम्या

Department of Agriculture : कृषी विभागाला विश्‍वासात न घेताच अहवाल सादर

पीकविमा मदतीच्या मुद्यावरून जिल्ह्यात घमासान सुरू झाले आहे. हा मुद्दा पेटल्याने व पोलिस तक्रार दाखल झाल्याने नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे.

Team Agrowon

बुलडाणा ः पीकविमा (Crop insurance) मदतीच्या मुद्यावरून जिल्ह्यात घमासान सुरू झाले आहे. हा मुद्दा पेटल्याने व पोलिस (Police) तक्रार दाखल झाल्याने नवनवीन माहिती समोर येऊ लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय कृषीविमा कंपनीने स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान या जोखिमेच्या बाबींतर्गत पीक नुकसानीबाबत प्राप्त तक्रारीचे बाधित क्षेत्र व नुकसानीची टक्केवारी कृषी विभागाला न कळविता परस्पर पंचनामे केल्याचे अधिकाऱ्याच्या पत्रात स्पष्ट म्हटले आहे.

रविकांत तुपकर यांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर त्यांना प्रशासनाकडून एक लेखी पत्र देण्यात आले आहे. या पत्रात म्हटले की, योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विमाधारकांचे क्षेत्र बाधित झाल्यास त्या क्षेत्राची कृषी सहायक संबंधित नुकसानग्रस्त शेतकरी व विमा कंपनी प्रतिनिधीच्या उपस्थितीत नुकसानीचा पंचनामा करीत असतो.

या पंचनामा अहवालावर उपस्थितांची संयुक्त स्वाक्षरी घेतल्यानंतर पंचनामा ग्राह्य समजल्या जातो. परंतु भारतीय कृषीविमा कंपनीने स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणी पश्चात नुकसान या जोखिमेच्या बाबींतर्गत पीक नुकसानीबाबत प्राप्त तक्रारीचे बाधित क्षेत्र व नुकसानीची टक्केवारी कृषी विभागाला न कळविता परस्पर पंचनामा केले आहेत.

या पंचनामा अहवालांवर कोणाचीही स्वाक्षरी न घेता नुकसानीची टक्केवारी व बाधित क्षेत्र अत्यंत कमी दाखवून पंचनामा अहवाल विमा कंपनीस सादर केलेले आहे. यानंतर कृषी विभागाला मिळालेल्या यादीतील शेतकऱ्यांना अत्यल्प प्रमाणात नुकसान भरपाई दिल्याचे दिसून आले. त्यामुळेच विमाधारक शेतकऱ्यांचा आक्रोश निर्माण झालेला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी मिळेपर्यंत हटणार नाही! भिलवडीत राजू शेट्टींचे कोरड्या कृष्णा नदीपात्रात ठिय्या आंदोलन

Banana Farmers : केळीच्या दांड्याचे वजन ठरतेय तोट्याचे; खरेदीदारांच्या मनमानीमुळे बळीराजा त्रस्त!

Drought Relief : दुष्काळी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे कडक निर्देश

SCROLL FOR NEXT