Organic Farming  Agrowon
ताज्या बातम्या

Organic Farming : सेंद्रिय शेतीच्या प्रसारासाठी प्रयत्नशील ः तिंबडिया

सेंद्रिय शेतीचा प्रसार करण्यासाठी गुजरात सरकार व गुजरात नैसर्गिक व सेंद्रिय शेती कृषी विद्यापीठ जास्तीत जास्त प्रयत्नशील राहील,’’ अशी ग्वाही विद्यापीठाचे कुलगुरू सी. के. तिंबडिया यांनी दिली.

टीम ॲग्रोवन

बोर्डी, जि. पालघर ः ‘‘शेतकऱ्यांनी केलेल्या सूचनांचा नक्की विचार केला जाईल. सेंद्रिय शेतीचा (Organic Farming) प्रसार करण्यासाठी गुजरात सरकार व गुजरात नैसर्गिक व सेंद्रिय शेती कृषी विद्यापीठ (Organic Farming Agriculture University) जास्तीत जास्त प्रयत्नशील राहील,’’ अशी ग्वाही विद्यापीठाचे कुलगुरू सी. के. तिंबडिया (C. K. Timbadiya) यांनी दिली.

नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचे प्रणेते भास्कर गुरुजी सावे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त गुजरात राज्यातील उंबरगाव तालुक्याच्या देगरी गावातील त्यांच्या कर्मभूमीत चर्चासत्र घेण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू टिंबडिया, निती आयोगाच्या सदस्य डॉ. मीनल पटेल, राष्ट्रीय किसान संघाचे महासचिव दिनेश कुलकर्णी, गुजरातचे अर्थमंत्री कनुभाई देसाई आदी या चर्चासत्रात सहभागी झाले.

सेंद्रिय व नैसर्गिक शेतीमध्ये भास्कर सावे यांचे योगदान जगाला मार्गदर्शक ठरणारे होते. मात्र गुजरात राज्यात त्यांच्या कामाची अद्यापही दखल घेतली गेलेली नाही, अशी खंत या वेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. विद्यापीठाला भास्कर सावे यांचे नाव द्यावे, अशी सूचनाही या वेळी करण्यात आली. भास्कर सावे यांचे चिरंजीव सुरेश सावे व नरेश सावे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop Insurance: सोयाबीनचा ३७ कोटी ४५ लाख रुपये पीकविमा मंजूर

Heavy Rain Damage: गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीचे भग्न अवशेष अजूनही तसेच

Sugarcane Crushing Target: ‘क्रांती’चे १३ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Kharif Sowing Advisory: अपुऱ्या पावसात पेरणीची घाई नको: जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Monsoon Delay Issue: पावसाच्या विलंबामुळे सिंचनाच्या गरजेत वाढ; शेतकरी चिंतेत

SCROLL FOR NEXT