Agriculture Department Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Department : रिक्‍तपदांमुळे कृषी विभाग खिळखिळा

Agriculture Minister : कृषिमंत्र्यांनी १०० दिवसांत रिक्‍तपदे भरणार असल्याचा दावा केला होता. मात्र त्यानंतरही ते भरण्यात आले नाही.

Team Agrowon

Chandrapur News : कृषिमंत्र्यांनी १०० दिवसांत रिक्‍तपदे भरणार असल्याचा दावा केला होता. मात्र त्यानंतरही ते भरण्यात आले नाही. परिणामी, नागभीड तालुका कृषी कार्यालयांतर्गंत १० कृषी सहायकांना तब्बल २४ साजांचा कारभार सांभाळण्याची वेळ आली आहे.

कृषी विभागात कृषी सहायक हा शासन व शेतकऱ्यांमध्ये दुवा ठरतो. मात्र जिल्हाभरात मोठ्या संख्येने कृषी सहायकांची पदे रिक्‍त असल्याने योजना प्रभावीपणे राबविण्याचे काम प्रभावित झाले आहे. दुर्गम नागभीड तालुक्‍यात देखील अशीच स्थिती आहे.

१९९५ मध्ये युती शासनाच्या काळात या ठिकाणी उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, तालुका तसेच मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. सुरुवातीला या ठिकाणी कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आली. त्यानंतर मात्र काही वर्षांतच कर्मचाऱ्यांच्या अनुशेषाला सामोरे जावे लागले.

आता तर या कार्यालयाची अवस्था फारच बिकट झाली आहे. येथील तालुका कृषी अधिकाऱ्याचे पद गेल्या अडीच वर्षांपासून रिक्‍त आहे. एखाद्या मंडळ अधिकाऱ्याकडे या पदाचा कार्यभार देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. इतकेच नाही तर या कार्यालयात कृषी सहाय्यकाची २४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी केवळ दहाच पदे भरलेली आहेत.

पदभरती विदर्भासाठी आणि अनुशेषही

विदर्भात रिक्‍त पदे असल्याने या भागासाठी पदभरती प्रक्रिया राबविली जाते. त्यानंतर प्रक्रिया राबवून सर्व पदे भरली जातात. त्यानंतर मात्र ज्या भागातील कृषी सहायक असेल त्या भागात काही वर्षांत बदली करून जातो. त्याकरिता राजकीय दबाव व इतर फंडे वापरले जातात. त्यामुळे अनुशेष कायम राहतो, अशी स्थिती आहे.

शासनाचे शेती आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष राहिले आहे. त्याच्याच परिणामी इतर क्षेत्राच्या तुलनेत शेती क्षेत्रातील कष्टकऱ्यांच्याच आत्महत्या होतात. याच क्षेत्रातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्‍त आहेत. त्यावरूनच शेतीसाठी काही करण्याची मानसिकताच शासनाची नाही हे स्पष्ट होते.
- वामनराव चटप, ज्येष्ठ नेते, शेतकरी संघटना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT