Irrigation Agrowon
ताज्या बातम्या

Takari Irrigation Scheme : ‘ताकारी’मुळे ओढे-नाले तुडुंब

Agriculture Irrigation : यंदा जिल्ह्याच्या दुष्काळी टापूत अजिबात पाऊस पडत नसल्याने चिंताजनक परिस्थिती उद्‌भवल्यानंतर ताकारी उपसा सिंचन योजना सुरू करणे भाग पडले.

Team Agrowon

Sangli News : यंदा जिल्ह्याच्या दुष्काळी टापूत अजिबात पाऊस पडत नसल्याने चिंताजनक परिस्थिती उद्‌भवल्यानंतर ताकारी उपसा सिंचन योजना सुरू करणे भाग पडले. त्यामुळे कडेगाव, खानापूर, तासगाव, पलूस आणि मिरज तालुक्यांतील लाभक्षेत्रातील शेती आणि पिण्याचे पाण्यासाठी ‘ताकारी’चे पाणी दिलासा ठरत आहे.

यंदा वळवासह मॉन्सूनच्या पावसानेही दडी मारल्याने या भागात जूनपासून पिण्याच्या पाण्याची भ्रांत निर्माण झाली होती. बरीचशी बारमाही पिके करपली आणि खरिपाच्या पेरण्या झाल्याच नाहीत. यासाठी ताकारी योजना सुरू करण्याबाबत सर्व स्तरांतून आग्रही मागणी झाल्यानंतर २३ जुलैपासून ही योजना सुरू करून लाभक्षेत्राला जगविण्याचा प्रयत्न झाला आहे.

योजनेतून पाझरणाऱ्या पाण्याने काही प्रमाणात येरळा नदीही प्रवाहित झाली असून नदीकाठच्या गावांचा पिण्याचा पाणीप्रश्न काही दिवस निकालात निघाला आहे. योजनेच्या पाण्यावर वाढलेले सिंचनक्षेत्र पाऊस नसतानाही ‘ताकारी’मुळे जिवंत राहिले आहे. सध्या योजनेचे १० पंप सुरू असून पाणी मुख्य कालव्याच्या ३० किलोमीटरच्या पुढे पोहोचले आहे.

अद्याप या परिसरांत कधीतरी रिमझिम पाऊस पडत असून अजून मोठ्या पावसाची प्रतीक्षाच आहे. त्यामुळे जमिनीतील नैसर्गिक पाणीपातळी ‘जैसे थे’ आहे. सोडण्यात आलेले पाणी किती दिवस पुरणार यानंतरचे पाणी कधी येणार, या विवंचनेत घाटमाथ्यावरील शेतकरी आहेत.

ताकारी प्रकल्पात वाळवा, कडेगाव, खानापूर, तासगाव, मिरज आणि पलूस तालुक्यांतील कमी-अधिक क्षेत्राचा समावेश होतो. योजनेचे २७ हजार ४३० हेक्टर लाभक्षेत्र असून यापैकी २० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. सध्या सोडलेले पाणी सर्व गरजू शेतकऱ्यांना मुबलक मिळेपर्यंत योजना बंद होणार नाही. तसेच सर्व पाणीसाठे भरून घेतले जातील.
- राजन डवरी, कार्यकारी अभियंता, ताकारी योजना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mukhyamantri Sahayata Nidhi: मुख्यमंत्री साह्यतामधून नाशिक विभागात ३५४२ रुग्णांना साडेबत्तीस कोटींची मदत  

Crop Insurance: अमरावती जिल्ह्यात केवळ २३ टक्के क्षेत्र विमासंरक्षित

Farmer Scam: कर्मचाऱ्याने लाभार्थ्यांचे २३ लाख लुबाडले

SMART Project: ‘स्मार्ट’अंतर्गत १६ ‘एफपीओं’ना १०.५३ कोटींचे अनुदान वितरित

Nanded Weather: नांदेडसाठी पुन्हा ‘येलो अलर्ट’ जारी

SCROLL FOR NEXT