Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Khandesh Rain Update : खानदेशात अनेक भागांत वादळी पाऊस

खानदेशात मंगळवारी (ता. १४) सकाळी अनेक भागांत वादळी पाऊस झाला. यात दादर ज्वारी, गहू, मका या पिकांची हानी झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon Rain Update जळगाव ः खानदेशात मंगळवारी (ता. १४) सकाळी अनेक भागांत वादळी पाऊस (Stormy Rain) झाला. यात दादर ज्वारी, गहू, मका या पिकांची हानी (Crop Damage) झाली आहे. काही भागात हलका ते मध्यम पाऊस व सुसाट वारा अशी स्थिती होती. तर काही भागांत फक्त जोरदार (Heavy Rain Khandesh) वाऱ्यांमुळे पीकहानी झाली आहे.

मध्यंतरी ५ ते ७ मार्च या दरम्यान खानदेशात गारपीट, वादळी पाऊस झाला होता. त्यात धुळ्यातील शिंदखेडा, साक्री व शिरपूर तालुक्यांत मोठी हानी झाली होती. तसेच जळगाव जिल्ह्यातही सुमारे १३ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले. आता पुन्हा रविवारी (ता.१२) ढगाळ वातावरण तयार झाले.

सोमवारीदेखील (ता.१३) वातावरण ढगाळ व पावसाळी होते. उकाडा वाढला. मध्येच ढग जमा होत होते. मंगळवारी सकाळीच अनेक भागांत सुसाट वारा व पाऊस झाला. ढगांचा गडगडाट सुरूच होता.

यात जळगाव जिल्ह्यातील चोपडा, धरणगाव, अमळनेर, एरंडोल, जळगाव या भागांत पीकहानी झाली आहे. तर धुळ्यातही शिरपूर, शिंदखेडा, धुळे, साक्री, नंदुरबारमधील तळोदा, शहादा भागांत हानी झाली आहे.

शेतकरी संकटात सापडले आहेत. ५ ते ७ मार्चदरम्यान झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होत नाहीत. तोच पुन्हा वेगवेगळ्या महसूल मंडलांत नुकसान झाले आहे. हे नुकसान किती क्षेत्रात आहे, त्याच्या टक्केवारीचा अंदाज अद्याप आलेला नाही. परंतु पिके आडवी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

कलिंगड, खरबूज या पिकांनाही फटका बसला आहे. लहान केळीचे कुठलेही नुकसान झालेले नाही. परंतु या केळीचीही पाने फाटून तिची वाढ पुढे कमी होईल.

त्यातही नुकसान सहन करावे लागेल. सुसाट वाऱ्याने मोठ्या व लहान केळीची पाने फाटली आहेत.

यात नुकसान दिसत नसले तरी उत्पादनावर परिणाम होईल, असे शेतकरी सांगत आहेत. खानदेशात ५ ते ७ मार्चदरम्यान झालेल्या वादळात सुमारे २३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.

फळांची घाईघाईने विक्री

नुकसानीच्या भीतीने शेतकऱ्यांनी कलिंगड, काकडी, खरबूज व पपई पिकांची घाईघाईने रविवारी (ता.१२) व सोमवारी (ता.१३) काढणी करून घेतली. यात शेतकऱ्यांना काहीसे कमी दर मिळाले. परंतु नुकसानीच्या भीतीने शेतकरी काढणी व मळणी वेगात करून घेत आहेत. ज्वारीही अनेक भागांत कापून ठेवली आहे. त्याची पावसाने नासाडी होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Supply Schemes Issue: निधीअभावी जलजीवन मिशनच्या ६८ पाणीपुरवठा योजना रखडल्या

Cotton Farming Techniques: हेक्टरी १२ ते १४ क्विंटल कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट; शास्त्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब करा

Farmer Loan Waiver: नांदेडमध्ये एक लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांना दिवाळीआधी २ हजार मिळणार; 'पीएम किसान'च्या २४ व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर

Food Conservation: अन्नाची बचत हीच अन्ननिर्मिती; अन्न-पाण्याची नासाडी टाळा : डॉ. इंद्र मणी मिश्रा

SCROLL FOR NEXT