Agriculture Electricity  Agrowon
ताज्या बातम्या

Agriculture Electricity : शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंदचे धोरण थांबवा

वीजवितरण कंपनीने थकीत वीजबिलाच्या नावाखाली वीज डीपीचा सरसकट वीजपुरवठा बंद करण्याचे धोरण थांबवावे. कारण राज्य अन्न आयोगाकडे अॅड. तल्लार यांच्यासह शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या संदर्भात जी तक्रार केली होती, त्याचा निकाल राज्य अन्न आयोगाने दिला आहे.

टीम ॲग्रोवन

पाचोरा, जि. जळगाव : ‘‘थकीत वीजबिलांच्या (Electricity Bll) नावाखाली वीज महावितरण (Mahavitaran) कंपनीकडून शेतकऱ्यांचा वीजपुरवठा (Power Supply Shutdown) डीपीसह बंद केला जात असून, हा प्रकार थांबवा; अन्यथा शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्यावतीने सेनास्टाईल आंदोलन करण्यात येईल. त्याची संपूर्ण जबाबदारी वीज वितरणची असेल,’’ असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अॅड, अभय पाटील यांनी दिला.

शिवतीर्थ या शिवसेना कार्यालयात ॲड. पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी शेतकरी सेनेचे अरुण पाटील, शहरप्रमुख अनिल सावंत उपस्थित होते. ॲड. पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा तसेच आरएसएस व भाजपकडून सामाजिक तेढ निर्माण करण्याचे जे धोरण विकसित केले जात आहे, त्याचा तीव्र शब्दात निषेध केला.

ॲड. पाटील म्हणाले, ‘‘वीजवितरण कंपनीने थकीत वीजबिलाच्या नावाखाली वीज डीपीचा सरसकट वीजपुरवठा बंद करण्याचे धोरण थांबवावे. कारण राज्य अन्न आयोगाकडे अॅड. तल्लार यांच्यासह शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी या संदर्भात जी तक्रार केली होती, त्याचा निकाल राज्य अन्न आयोगाने दिला आहे.

आयोगाने वीज वितरण कंपनीला स्पष्ट सूचित केले आहे, की थकीत वीजबिलाच्या कारणाखाली कोणत्याही शेतकऱ्यांचा वीजपुरवठा बंद करू नये. इतर कायदेशीर बाबींचा अवलंब करून आपल्या वीजबिलाची वसुली करावी, असे असताना वीजवितरणकडून वीज बंद करण्याचे धोरण सुरूच ठेवण्यात आले आहे. हा आयोगाच्या निकालाचा अवमान आहे.’’ अरुण पाटील यांनीही वीज वितरणच्या वीजबंद करण्याच्या धोरणावर टीका केली. अनिल सावंत यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT