MPKV, Rahuri  Agrowon
ताज्या बातम्या

MPKV Rahuri : महात्मा फुले कृषी विद्यापीठात क्रीडा स्पर्धेला सुरूवात

महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत विद्यापीठस्तरीय निम्नस्तर कृषी शिक्षण क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली.

Team Agrowon

नगर ः वेगवेगळे खेळ खेळताना शरीराचा व्यायाम होतो व शरीरामध्ये प्राणवायू वाढतो. प्राणवायू वाढल्यामुळे शरीर तंदुरुस्त (Health) राहते.

क्रीडा स्पर्धेत (Sports Competition) भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा एकमेकांशी संवाद साधला जातो, विचारांची देवाण घेवाण होते, यामुळे व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.

व्यायाम केल्याने व क्रीडा स्पर्धेत भाग घेतल्याने शरीरामध्ये स्फूर्ती निर्माण होते, खिलाडूवृत्ती वाढते व संघ भावना निर्माण होते, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी (MPKV Rahuri) विद्यापीठाचे अधिष्ठाता (कृषी) डॉ. उत्तम चव्हाण यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत विद्यापीठस्तरीय निम्नस्तर कृषी शिक्षण क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली.

या वेळी डॉ. उत्तम चव्हाण यांच्यासह संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, सहयोगी अधिष्ठाता (निकृशि) डॉ. श्रीमंत रणपिसे, सहयोगी अधिष्ठाता (पम) डॉ. बापूसाहेब भाकरे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार,

हळगांव कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चौहान, क्रीडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड, प्राचार्य डॉ. विश्‍वनाथ शिंदे, डॉ. राहुल देसले,

डॉ. कुमार गुरव, डॉ. अविनाश गायकवाड, डॉ. मधुकर बेडीस, डॉ. मोहन शिर्के, डॉ. जे. डी. जाधव, डॉ. एस. के. कांबळे, प्रसारण केंद्र प्रमुख डॉ. पंडित खर्डे, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. दत्तात्रय पाचारणे, जनसंपर्क अधिकारी डॉ. गोकुळ वामन उपस्थित होते.

सहयोगी अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यापीठस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये खो-खो आणि व्हॉलिबॉल हे दोन क्रीडा प्रकार खेळले जाणार आहे. यामध्ये दहा जिल्ह्यांतून खो-खोचे मुलांचे ८ संघ, मुलींचे ९ संघ आणि व्हॉलिबॉलमध्ये मुलांचे ९ संघ आणि मुलींचे ८ संघ असे एकूण ३४ संघ सहभागी झालेले आहेत.

या स्पर्धेमध्ये १९० मुली व १४२ मुले सहभागी झालेले आहे. प्रथम खेळाडूंचे संचालन झाले, संघनायकांची ओळख परेड झाली, ध्वजवंदन करण्यात आले, महात्मा फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

या वेळी विद्यार्थी विकास धुळगंड यांनी खेळाडूंना शपथ दिली. या क्रीडा स्पर्धेच्या उद्‌घाटन प्रसंगी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील दहा जिल्ह्यांतून ४५० विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राहुल खुळे यांनी केले. तर डॉ. जे. डी. जाधव यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain Damage: गारपीट अवकाळीचा पिकांना तडाखा; विदर्भ, मराठवाड्यात पिकांचे नुकसान; बळीराजा संकटात

Panchayat Raj Abhiyan: पंचायतराज समृद्ध अभियानात सोलापुरातील २५० गावांचा सहभाग

Farmers Demands: ‘आधी गळती काढा, मगच पाणी सोडा’

Nira Canal Water Release: नीरा उजवा कालव्यातून उन्हाळी आवर्तनाला सुरुवात

Agrowon Podcast: सोयाबीनचा भाव टिकून; कापुस दरात सुधारणा, कैरीला उठाव, कलिंगडाला मागणी तर तुरीचे दर स्थिरावले

SCROLL FOR NEXT