Crop Damage
Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : जिल्ह्यातील सोयाबीन, तूर, मूग, उडीद पिके पाण्यात

टीम ॲग्रोवन

सोलापूर ः जिल्ह्याला पुन्हा एकदा जोरदार पावसाने झोडपले (Heavy Rain) आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागांत गेल्या दोन दिवसांपासून सतत होणाऱ्या पावसाने खरीप पिकांना मोठा फटका (Kharif Crop Damage) बसला आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीन (Soybean), तूर (Tur), मूग, उडीद ही पिके पाण्यात आहेत. करमाळा, माढा, अक्कलकोट, बार्शी, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या भागांत पावसाचा जोर सर्वाधिक आहे. बुधवारी (ता. ७) सलग दुसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली.

गेल्या दोन दिवसांपासून दिवसभर कधी ऊन, कधी ढगाळ असे वातावरण आहे. दुपारनंतर हमखास पाऊस होतो आहे. सोयाबीन, तूर, उडीद, मुगाच्या शिवारात पाणी साठून राहिल्याने आता उरलेली पिकेही हातची जाणार आहेत.

मोहोळमधील नरखेड, सावळेश्‍वर, वडवळ, मसले चौधरी या भागांत पावसाने नुकसान केले आहे. उत्तर सोलापुरातील नान्नज, मार्डी, कारंबा, होनसळ, पडसाळी, रानमसले, बीबीदारफळ या भागात जोर आहे. अक्कलकोट तालुक्यातील दुधनी, मैंदर्गी, किणी या मंडळात सर्वाधिक पाऊस झाला. मंगळवेढ्यातील मुंढेवाडी, बोराळे शिवाराला पावसाने चांगलेच झोडपले आहे.

भीमा नदीत विसर्ग

पुणे जिल्ह्यातील धरणांकडून उजनी धरणाकडे येणाऱ्या पाण्याचा विसर्ग गुरुवारी (ता. ८) पुन्हा कायम राहिला. गुरुवारी दौंडकडून ११ हजार ९२७ क्युसेक इतका विसर्ग उजनीकडे येत होता. त्यामुळे धरणातील पाणीपातळी वाढली. धरणामध्ये एकूण पाणीपातळी ४९७.३१० मीटर राहिली. तर एकूण पाणीसाठा १२३.३ टीएमसी आणि त्यापैकी उपयुक्त साठा ५९.३७ टीएमसी एवढा राहिला. तर या पाण्याची टक्केवारी ११०.८२ टक्क्यापर्यंत पोहोचली. तर धरणातील वाढलेल्या पाणीपातळीने पुढे पूरस्थिती उद्‍भवू नये, यासाठी उजनीतून पुढे भीमा नदीतही ४० हजार क्युसेक इतके पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT