Sangli Rain  Agrowon
ताज्या बातम्या

Soybean Crop Damage : सांगलीत सोयाबीन धोक्यात

या पावसाचा अडथळा सोयाबीन पीक काढणीला होत आहे. त्यामुळे पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. परिणामी, ७५ टक्के म्हणजे ३१ हजार ५०० हेक्टरवरील सोयाबीन काढणी खोळंबली आहे.

टीम ॲग्रोवन

सांगली ः जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून सोयाबीन पिकाची काढणी (Soybean Harvesting) सुरू झाली असून, आतापर्यंत सुमारे २५ टक्के क्षेत्रावरील पीक निघाले असल्याचा अंदाज कृषी विभागाने (Agriculture Department) व्यक्त केला आहे. परंतु जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी (Rainfall) लावली आहे.

या पावसाचा अडथळा सोयाबीन पीक काढणीला होत आहे. त्यामुळे पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. परिणामी, ७५ टक्के म्हणजे ३१ हजार ५०० हेक्टरवरील सोयाबीन काढणी खोळंबली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ४२ हजार हेक्टरवर पेरा झाला. सुरुवातीपासून सोयाबीन पिकाची वाढ चांगली होऊ लागली. परंतु सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचा याचा फटका बसला. त्यातच ‘येलो मोझॅक’ रोगाचा प्रादुर्भाव झाला. यामुळे शेतकरी संकटात सापडला. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात पन्नास टक्के घट शक्य असल्याचे अंदाज व्यक्त केले जात आहे.

गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून शेतकरी सोयाबीन पिकाची काढणी आणि मळणी करण्याचे नियोजन सुरू केले आहे. वाळवा तालुक्यासह पलूस, कडेगाव, मिरज तालुक्यात सोयाबीन काढणीची लगबग सुरू होती. जिल्ह्यात सुमारे २५ टक्के म्हणजे १० हजार ५०० हेक्टरवरील सोयाबीनची काढणी झाली असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून परतीच्या पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडला. यामुळे शेतात पाणी साचल्याने सोयाबीन पिकाची काढणी करणे मुश्कील झाले आहे. अर्थात, सुमारे ३१ हजार हेक्टरवरील सोयाबीन काढणी रखडली आहे.

जिल्ह्यात सोयाबीन पिकाची २५ टक्के काढणी झाली असल्याचा अंदाज आहे. परतीचा पाऊस सुरू झाल्याने सोयाबीन पिकांची काढणी थांबली आहे. पाऊस थांबल्यानंतरच सोयाबीनचे किती नुकसान झाले आहे, याची पाहणी केली जाईल.- प्रकाश सूर्यवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली

परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान होऊ लागले आहे. शेतात पाणी साचल्याने कोंब फुटू लागले आहेत.-
रमेश जाधव, सोयाबीन उत्पादक शेतकरी, येलुर, ता. वाळवा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT