Sowing  Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing : नांदेड जिल्ह्यात दमदार पावसाने पेरण्यांना प्रारंभ

Kharif Season : मंगळवारी सुरू झालेल्या पावसाने बुधवारी (ता. ५) दमदार हजेरी लावली. हा पाऊस किनवट, माहूर व हिमायतनगर तालुके वगळता इतर १३ तालुक्यांत जोरदार झाल्याने खरिपातील पेरण्यांच्या कामांना पुन्हा सुरुवात झाली आहे.

Team Agrowon

Nanded News : मंगळवारी सुरू झालेल्या पावसाने बुधवारी (ता. ५) दमदार हजेरी लावली. हा पाऊस किनवट, माहूर व हिमायतनगर तालुके वगळता इतर १३ तालुक्यांत जोरदार झाल्याने खरिपातील पेरण्यांच्या कामांना पुन्हा सुरुवात झाली आहे.

पावसामुळे लोहा व बिलोली तालुक्यातील प्रत्येक एका मंडलासह मुखेडमधील सहा मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली. मागील २४ तासांत जिल्ह्यात २०.३० मिलिमीटर पाऊस झाला. विलंबाने का होईना दमदार पावसाने शेतकरी सुखावला आहे.

जिल्ह्यात दीर्घ विश्रांतीनंतर मंगळवारी पावसाने सुरुवात केली. हा पाऊस जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत झाला होता. यामुळे शेतकऱ्यांनी रखडलेल्या पेरण्यांना सुरुवात केली. यानंतर बुधवारी (ता. ५) जिल्ह्यात दुपारनंतर अनेक भागांत पावसाने हजेरी लावली. किनवट, माहूर व हिमायतनगर तालुक्यांत तुरळक झाला.

इतर १३ तालुक्यांत मात्र दमदार हजेरी लावली. या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत पेरण्यांच्या कामांना सुरुवात झाली. बुधवारी झालेला पाऊस मुखेड तालुक्यातील येवती मंडलात ८६ मिलिमीटर, जाहूर ८६, जांब ८४.२५, मुखेड ६६.७५, चांडोला ७१, अंबुलगा ८६, बिलोली तालुक्यातील आदमपूर ९२.७५ व लोहा तालुक्यातील मालाकोळी मंडलात ७१ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने या आठ ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

यासोबतच बाऱ्हाळी ६०.८, सगरोळी ६१, दिग्रस ४६.८, लोहा ४७, कलंबर २८.५, तळणी २९, शाहापूर ५९, नरंगल ६१.३, इस्लापूर ४०.८, जलधारा ३८.८, करखेली ४३, उमरी ३४.५, सिंधी ४०.८, बरबडा ४९, माजंरम ४८.३, नायगाव २६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

तालुकानिहाय झालेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)

नांदेड १२.३०, बिलोली ४१.५०, मुखेड ७०.४०, कंधार २७.८०, लोहा ३४.१०, हदगाव ७.९०, भोकर ११.७०, देगलूर ३०.२०, किनवट १.९०, मुदखेड १२.२०, हिमायतनगर ४, माहूर ०.९०, धर्माबाद १६.४०, उमरी २४.९०,

अर्धापूर ८, नायगाव ३६.०० मिलिमिटर. चोवीस तासातील सरासरी २४.३० मिलिमीटर. आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी ९५.६० मिलिमीटर वार्षिक सरासरीच्या १०.७३ टक्के पाऊस बंद झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT