Rabi Sowing  Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Sowing : बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची १२३ टक्के क्षेत्रावर पेरणी

रब्बी हंगामात पश्‍चिम विदर्भात सर्वाधिक पेरणी होणाऱ्या या जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी क्षेत्राच्या सुमारे १२३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

Team Agrowon

बुलडाणा ः रब्बी हंगामात (Rabi Season) पश्‍चिम विदर्भात सर्वाधिक पेरणी (Sowing) होणाऱ्या या जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी क्षेत्राच्या सुमारे १२३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अपेक्षेप्रमाणे हरभरा (Chana Sowing) हेच प्रमुख पीक याही हंगामात राहिलेले आहे. गव्हाच्या लागवडीनेही ५० हजार हेक्टरचा आकडा पार केला आहे.

जिल्ह्याचे सरासरी क्षेत्र दोन लाख २७ हजार २१४ हेक्टर असताना प्रत्यक्ष दोन लाख ७९ हजार ६१३ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. अद्यापही काही शेतकरी पेरणी करीत असल्याने या आकड्यात वाढ अपेक्षित आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने तेराही तालुक्यांमध्ये हरभऱ्याचीच सर्वाधिक पेरणी झाली.

परिणामी, सरासरी १ लाख ४५ हजार हेक्टरच्या तुलनेत हरभऱ्याचे क्षेत्र दोन लाख ४५९४ हेक्टरपर्यंत पोहोचले. गव्हाची दुसऱ्या क्रमाकांवर लागवड झाली. ५६३९६ हेक्टरच्या तुलनेत ५३ हजार ४७४ हेक्टरवर पेरणी आटोपली. जिल्ह्यात मक्याची लागवड सरासरीपेक्षा अधिक झाली. ११७८१ हेक्टर सरासरी क्षेत्र असून, आतापर्यंत १२३५१ हेक्टरवर मक्याची लागवड पूर्ण झाली.

करडईच्या क्षेत्रात वाढ

गळीत धान्यात करडईची लागवड यंदा वाढली आहे. सरासरी १०३ हेक्टरपर्यंत दर वर्षी लागवड राहते. यंदा हीच लागवड ३९० हेक्टरपर्यंत पोहोचली आहे. सूर्यफुलाची लागवडही १०० हेक्टरपर्यंत पोहोचली आहे.

पिकांची स्थिती चांगली

रब्बी हंगामात हरभरा, मका, गहू या पिकांची लागवड वाढली आहे. . मागील तीन ते चार दिवसांत वातावरण बदलल्याने काही प्रमाणात हरभरा पिकाला नुकसान संभवत आहे. यंदा गव्हाचे उत्पादन चांगले होण्याची अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT