Rabi Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Rabi Sowing : खानदेशात रब्बीची पेरणी वेगात

खानदेशात रब्बीची पेरणी २०० टक्क्यांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यातील पेरणी वेगात सुरू आहे. त्यात कोरडवाहू हरभरा पेरणी पूर्ण झाली आहे.

टीम ॲग्रोवन

जळगाव ः खानदेशात रब्बीची पेरणी (Rabi Sowing) २०० टक्क्यांवर पोहोचण्याचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यातील पेरणी (Sowing) वेगात सुरू आहे. त्यात कोरडवाहू हरभरा पेरणी (Chana Sowing) पूर्ण झाली आहे. धुळे व नंदुरबारातील पेरणीदेखील बऱ्यापैकी आहे.

बाजरी पेरणी जानेवारीत सुरू होईल. तसेच कांदा लागवडही झाली आहे. हे क्षेत्र लक्षात घेता पेरणी आणखी वाढेल, असे दिसत आहे. खानदेशात एकूण चार लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी होणार आहे.

जळगाव जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र ९२ हजार हेक्टर आहे. परंतु जळगाव जिल्ह्यात पेरणी सुमारे दीड लाख हेक्टरवर झाली आहे. धुळ्यात सुमारे ३८ हजार हेक्टर एवढे रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. पण तेथेही पेरणी ४० हजार हेक्टरवर होईल.

नंदुरबार जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्र सुमारे ३० हजार हेक्टर आहे. तेथेही पेरणी ३१ हजार हेक्टरपेक्षा अधिक होऊ शकते. जळगाव जिल्ह्यात सुमारे ६० हजार हेक्टरवर ही पेरणी झाली आहे. त्यात कोरडवाहू हरभरा पेरणी पूर्ण झाल्याची माहिती आहे. या जिल्ह्यात रब्बीची पेरणी २०० टक्क्यांवर जाईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Return: मॉन्सून घेणार महाराष्ट्राचा निरोप

Cooperative Minister Statement: लोकांना कर्जमाफीचा नाद : सहकारमंत्री पाटील

PM Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांना आज मिळणार ४२ हजार कोटींची भेट

Agristack Registration Issue : शहरी नक्षलवाद्यांच्या धर्तीवर आता ‘शहरी शेतकरी’

Maharashtra October Heat: ‘ऑक्टोबर हीट’चा चटका वाढला

SCROLL FOR NEXT