Rabi Sowing
Rabi Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Rani Sowing : पाच जिल्ह्यांत रब्बी पिकांची १० लाख २० हजार हेक्टरवर पेरणी

टीम ॲग्रोवन

उस्मानाबाद : लातूर कृषी विभागांतर्गत (Agriculture Department) पाच जिल्ह्यांत २५ नोव्हेंबर अखेरपर्यंत रब्बीची ७५ टक्के पेरणी (Rabi Sowing) उरकली आहे. जवळपास १० लाख २० हजार ९९६ हेक्टरवर रब्बीची पेरणी (Sowing) झाली आहे. खरिपात मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या सर्व अशा आता रब्बीवर टिकून आहेत.

यंदाच्या रब्बी हंगामासाठी लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, परभणी या पाच जिल्ह्यांत रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र १३ लाख ६३ हजार ९३१ हेक्टर होते. त्या तुलनेत प्रत्यक्षात १० लाख २० हजार ९६ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये हरभऱ्याची सर्वाधिक, तर त्या पाठोपाठ रब्बी ज्वारी, गहू व इतर पिकांना शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे.

असा प्राधान्यक्रम असला तरी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ज्वारी, गहू, मक्का आदी प्रमुख पिकांची सर्वसाधारण क्षेत्राच्या निम्म्या क्षत्रावरही पेरणी झाली नसल्याची स्थिती आहे. पेरणी झालेल्या रब्बी क्षेत्रात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ९०.५२ टक्के, त्या पाठोपाठ लातूर जिल्ह्यात ८७.४५ टक्के, हिंगोली जिल्ह्यात ७६.४३ टक्के, परभणी जिल्ह्यात ६४.४१ टक्के, तर उस्मानाबाद जिल्ह्यात ६३.९१ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे.

७ लाख ३३ हजार हेक्‍टरवर हरभरा

पाचही जिल्ह्यांत हरभऱ्याची ७ लाख ३३ हजार ८९५ हेक्‍टरवर, रब्बी ज्वारीची १ लाख ८० हजार २०४ हेक्टरवर, गव्हाची ७७५५६ हेक्‍टरवर, मक्का ८०१९ हेक्टरवर, इतर तृणधान्ये ६३० हेक्टरवर, इतर कडधान्य ४२३२ हेक्टरवर करडई १५६१२ हेक्टरवर जवस २०१ हेक्टरवर, तीळ ३७ हेक्टरवर, सूर्यफूल ७५ हेक्टरवर, इतर गळीत धान्य ४७५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. जवस, तीळ, सूर्यफूल, इतर गळीत धान्य व इतर कडधान्यांना रब्बीच्या पेरणीत शेतकऱ्यांनी फारसे महत्त्व दिले नसल्याचे चित्र आहे. शिवाय करडईची पेरणी ही अपेक्षेप्रमाणे वाढत असल्याची स्थिती आहे.

जिल्हानिहाय सर्वसाधारण क्षेत्र

व प्रत्यक्ष पेरणी (हेक्टरमध्ये)

जिल्हा सर्वसाधारण क्षेत्र प्रत्यक्ष पेरणी

लातूर २८०४३७ २२५२३२

उस्मानाबाद ४१११७२ २६२७८९

नांदेड २२४६३४ २०३३३६

परभणी २७०७९५ १७४४३१

हिंगोली १७६८९३ १३५२०८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate : कांद्याचे बाजार शुल्क घटवले एक रुपयावरून ५० पैशांवर

Crop Damage : गारपीट, वादळी पाऊस होऊनही पीक नुकसान नसल्याचा अहवाल

Veterinary : पशुचिकित्सा पुनर्रचनेविरोधात पदविकाधारकांनी थोपटले दंड

Crop Damage : अवकाळी पावसामुळे एक हजार हेक्टरवर नासधूस

Onion Market : ‘एनसीसीएफ’द्वारे उद्यापासून सुरू होणार कांदा खरेदी

SCROLL FOR NEXT