Ashadhi Wari 2023 Update : महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांना सध्या पंढरपुरच्या आषाढी वारीचे वेध लागले आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांचे काही दिवसांतच प्रस्थान होणार आहे.
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा ३३८ वा पालखी सोहळा आहे. यावर्षी पालखीच्या सारथ्याचा मान देहू गावातील सुरेश दिगंबर मोरे यांच्या सोन्याा-खासदार आणि पिंपळे सौदागर येथील महेंद्र बाळकृष्ण झिंजुर्डे यांच्या राजा-सोन्या या बैलजोडींना मिळाला आहे.
राज्यातील लाखो वारकऱ्यांचे श्रध्दास्थान असलेल्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ भाविकांनी लागली आहे. १० जून रोजी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पंढरपुरकडे प्रस्थान होणार आहे.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा यंदाचा ३३८ वा पालखी सोहळा असून पालखी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यंदा पालखीचा रथ ओढण्याचा मान सोन्या-खासदार आणि सोन्या-राजा या बैलजोडींना मिळाला आहे.
देहूगाव येथील श्री संत तुकाराम महाराजांचे वंशज असलेले सुरेश दिगंबर मोरे यांच्या सोन्या आणि खासदार तर पिंपळे सौदागर येथील महेंद्र बाळकृष्ण झिंजुर्डे यांच्या राजा- सोन्या या बैलजोडींना पालखीचा रथ ओढण्याचा मान मिळाला आहे. तर, सनई-चौघडा गाडीला जुंपण्याचा मान चिंबळी येथील सत्यवान जैद यांच्या राजा-सर्जा या बैलजोडीला मिळाला आहे.
पालखी रथासाठी १८ बैलजोडी मालकांचे अर्ज
यंदाच्या पालखी सोहळ्यासाठी पालखीचा मुख्य रथ ओढण्यासाठी बैलजोडी मालकांकडून अर्ज मागविण्यात आले होते. यासाठी १८ बैलजोडी मालकांनी अर्ज केले होते. तर सनई-चौघड्याच्या रथासाठी चार बैलजोडी मालकांचे अर्ज संस्थानकडे प्राप्त झाले होते.
अशी होती मानाच्या बैलजोडीची निवड
पालखीचा रथ ओढण्यासाठी सक्षम बैलजोड्यांची निवड केली जाते. यासाठी काही विशिष्ट निकष लावले जातात. बैलजोडीची निवड करताना बैलांचे वय, छाती, शिंगे, शेपटी, खूर, चाल, आणि रथ ओढण्याची क्षमता याचे परिक्षण केले जाते. या परिक्षणामध्ये पास होणाऱ्या बैलजोडीची निवड पालखीचा मानाचा रथ ओढण्यासाठी केली जाते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.