Gold Agrowon
ताज्या बातम्या

Gold Rate : सोने दरात काहीशी नरमाई ; चांदीच्या दरात वाढ

Gold -Silver Rate : सराफ बाजारात सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी ५९ हजार रुपयांखाली होता.

Team Agrowon

Jalgaon News : सोने-चांदीच्या दरात मागील सात ते आठ दिवसांपासून चढउतार सुरूच आहेत. सोने दरात काहीशी नरमाई आली असून, दर प्रति १० ग्रॅमसाठी (प्रतितोळा) ५९ हजार ११० रुपये (जीएसटीसह) आहे.

जागतिक बाजारातील उलाढालींचा परिणाम सोने-चांदीच्या दरांवर होत आहे. यातच सोने व चांदीच्या दरात चढउतार सुरूच असून, मंगळवारी (ता. १२) सराफ बाजारात सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी ५९ हजार रुपयांखाली होता. दुसरीकडे बुधवारी (ता. १३) चांदीच्या दरात वाढ झाली.

मंगळवारी बाजार उघडताच सोने दर १० ग्रॅममागे ५० रुपयांनी कमी झाले. चांदीच्या दरात एक किलोमागे १७० रुपयांची वाढ झाली. २२ कॅरेट सोन्याचा दर ५४ हजार १८४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर २४ कॅरेट सोन्याचा दर (जीएसटीसह) ५९ हजार ११० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. १७० रुपयांच्या वाढीसह चांदीचा दर ७२ हजार ३० रुपये प्रति किलोवर पोहोचला.

मागील आठवड्यात सोने दरात किंचित वाढ झाली होती. त्यात मात्र घसरण झाली. मागील पंधरवड्यात सोने दर प्रति १० ग्रॅमसासाठी ५९ हजार १०० रुपये होता. अर्थात दरात मोठी वाढ मागील १५ ते २० दिवसात झालेली नाही, अशी माहिती सराफ बाजारातील सूत्रांनी दिली.

चांदी दरात मात्र मोठी वाढ मागील १५ दिवसांत झाली आहे. चांदी दरात सतत वाढ सुरू आहे. सणासुदीमुळे सोने व चांदीला मागणी सुरू आहे. पुढे मागणी आणखी वाढू शकते. परंतु ग्रामीण भागातील मागणी मात्र कमी आहे. येथील सराफ बाजारात सोने-चांदीच्या विक्रीपोटी रोज पाऊण कोटींपर्यंतची उलाढाल सध्या होत आहे. सणासुदीत किंवा नवरात्रोत्सवात ही उलाढाल वाढेल. ती प्रतिदिन एक ते सव्वा कोटी रुपयांवर पोहोचेल, असाही अंदाज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT