Jalgaon Agrowon
ताज्या बातम्या

Banana Farmer : केळी उत्पादकांचे प्रश्‍न सोडवू

Banana Market : आगामी दोन महिन्यात या विषयांचा अभ्यास करून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू,’’ असे आश्वासन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी रावेर येथे बोलताना दिले.

Team Agrowon

Jalgaon News : ‘‘तालुक्यासह जिल्ह्यातील केळी उत्पादकांचे केळीचे अस्थिर भाव, सीएमव्ही रोगाचे व्यवस्थापन, केळी निर्यात, अपेडाकडून मिळणाऱ्या सवलती व सुविधा, प्रस्तावित केळी महामंडळ हे विषय जिव्हाळ्याचे आहेत.

आगामी दोन महिन्यात या विषयांचा अभ्यास करून हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू,’’ असे आश्वासन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी रावेर येथे बोलताना दिले.

येथील बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात केळी उत्पादक शेतकरी, व्यापारी, बाजार समितीचे पदाधिकारी व संचालक यांच्या संयुक्त बैठकीत मित्तल बोलत होते.

केळीचे भाव स्थिर राहत नसल्याच्या बातम्या वाचून श्री. मित्तल यांनी पुढाकार घेत या बैठकीचे नियोजन केले. त्यांनी केळी उत्पादकांच्या समस्या ऐकून घेतल्या व त्यावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.

जिल्ह्यातील सुमारे १६०० केळी उत्पादकांची भरपाईची रक्कम प्रलंबित आहे. उपपदार्थ निर्मितीवर भर देत तालुक्याला केळी निर्यात झोन जाहीर करावा.

केळीवरील सीएमव्ही रोगावर उपाय करावेत. आरटीओ कार्यालयाकडून चोरवड नाक्यावर केळी उत्पादकांना भुर्दंड बसतो आदी तक्रारी, मागण्या केळी उत्पादकांनी केल्या.

श्री. मित्तल म्हणाले, ‘‘पीक विम्याच्या प्रलंबित रकमेबाबत तातडीने कार्यवाही सुरू करू. शालेय पोषण आहारात केळीचा समावेश करण्याबाबत डिसेंबरपर्यंत निर्णय घेऊ. शितगृहासाठी बाजार समितीने प्रस्ताव द्यावा.

आपण त्यासाठी निधी देण्यासाठी प्रयत्न करू. सीएमव्ही रोगाचा समावेश केळी पीकविमा योजनेत होण्यासाठीही लक्ष घालू.’’ बाजार समितीचे सचिव गोपाळ महाजन यांनी सूत्रसंचालन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT