Gold Rate Agrowon
ताज्या बातम्या

Gold Rate : सोने दरात नरमाई; चांदीच्या दरात तेजी

गेल्या महिन्यात गुरुपुष्यामृत योगावर चांदीच्या दरात साडेचार हजारांची घसरण झाली होती.

Team Agrowon

गेल्या महिन्यात गुरुपुष्यामृत योगावर चांदीच्या दरात साडेचार हजारांची घसरण झाली होती. याचा लाभ घेत अनेकांनी चांदीत गुंतवणूक (Silver Investment) केली. आता पंधरा दिवसांनी चांदीच्या दरात चार हजारांची वाढ झाली आहे, तर सोन्याच्या (Gold Market) दरात एक हजार रुपयांनी घसरण झाली आहे. गेल्या महिन्यात २२ ऑगस्टला सोन्याचा दर ५२ हजार प्रति तोळा होता. आता तो दर ५१ हजार झाला आहे. तर चांदीचा दर ५६ हजार ५०० प्रतिकिलो होता. तो दर कमी होत ३ सप्टेंबरला ५४ हजारांपर्यंत खाली आला होता.

आता तो दर ५८ हजारांवर पोहोचला आहे. लग्नसराई, बारसे यांसारखे मुहूर्त साधून होणारे कार्यक्रम नाही. रशिया व युक्रेनमधील युद्धामुळे सोने, चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत गेली. नंतर मात्र युद्धात शिथिलता येताच सोने, चांदीच्या दरात घसरण सुरू झाली आहे. मार्च महिन्यात सोन्याच्या दरात २७०० ची, तर चांदीच्या दरात दोन हजार रुपयांनी घसरण झाली होती.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताअगोदर चांदीचा दर ६९ हजारांवर (प्रतिकिलो) गेला होता; मात्र नंतर थेट चार हजार रुपयांनी घसरण होऊन चांदी ६५ हजार रुपयांपर्यंत आली होती. तर सोन्याच्या दरात एका तोळ्यामागे ३५० रुपयांची घसरण झाली होती. १४ मेस सोन्याचा दर ५० हजार ६०० प्रतितोळा होते. चांदी ६१ हजारांवर होती. २३ मेस सोन्याचा दर ९०० रुपयांनी वाढून ते ५१ हजार ५०० रुपयांवर गेले.

तर चांदीच्या दरात तीन हजारांनी वाढ होऊन ६४ हजारांवर गेली. ३० मेस सोने ५१ हजार ७०० रुपये, तर चांदी ६३ हजारांवर गेली. ११ जूनला सोने दर ५२ हजार, तर चांदी दर ६३ हजार ५०० होता. २२ जूनला सोन्याचे दर ५१ हजार, तर चांदी दर ६२ हजार ५०० होता. २२ ऑगस्टला सोन्याचे दर ५२ हजार, तर चांदीचा दर ५६ हजार ५०० वर आला होता.

सोने, चांदीचे दर असे (जीएसटीविना)

तारीख -- सोने (प्रतितोळे) -- चांदी (प्रतिकिलो)

२२ ऑगस्ट -- ५२ हजार -- ५६ हजार ५००

२ सप्टेंबर -- ५० हजार ८०० -- ५४ हजार

३ सप्टेंबर -- ५१ हजार -- ५४ हजार ५००

६ सप्टेंबर -- ५१ हजार २०० -- ५५ हजार ५००

७ सप्टेंबर -- ५० हजार ७०० -- ५४ हजार ५००

९ सप्टेंबर -- ५१ हजार १०० -- ५६ हजार

१३ सप्टेंबर -- ५१ हजार -- ५८ हजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT