ताज्या बातम्या

E Commerce : ओएनडीसी’च्या ई-कॉमर्सवर होणार नंदुरबारमधील शेती उत्पादनांची विक्री

जिल्हाधिकारी कार्यालय, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग व नाबार्डच्या सहकार्यातून जिल्ह्यातील स्थानिक बचत गट, शेतकरी गट, उत्पादक कंपन्यांमार्फत तयार करण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण वस्तू व मालाची विक्री केंद्र सरकारच्या ओएनडीसीच्या डिजिटल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर करता यावी

Team Agrowon

नंदुरबार : जिल्हाधिकारी कार्यालय, कौशल्य विकास व उद्योजकता (Skill Development And Entrepreneurship) विभाग व नाबार्डच्या सहकार्यातून जिल्ह्यातील स्थानिक बचत गट, शेतकरी गट (Farmer Group), उत्पादक कंपन्यांमार्फत तयार करण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण वस्तू व मालाची विक्री केंद्र सरकारच्या ओएनडीसीच्या डिजिटल ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर (Digital e Commerce Platform) करता यावी, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कौशल्य विकास व उद्योजकता विभाग आणि प्रोटिन टेक्नॉलॉजी, मुंबई यांच्यासमवेत सामंजस्य करार झाला.

या वेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहायक जिल्हाधिकारी पुलकित सिंह, मंदार पत्की, नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक प्रमोद पाटील, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त विजय रिसे, ओएनडीसीचे प्रोटिन टेक्नॉलॉजीचे व्हाइस प्रेसिडेंट अंकुश देशपांडे, रॉबिन पांडे आदी उपस्थित होते.

या वेळी ओएनडीसीचे प्रोटिन टेक्नॉलॉजीचे अंकुश देशपांडे आणि रॉबिन पांडे यांनी ओएनडीसी या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर आणि या प्रोजेक्टअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या ‘नंदुरबार ई-मार्केट प्लेस’च्या वापरासंदर्भात सादरीकरण केले. पहिल्या फेरीत पाच विक्रेत्यांची नोंदणी या प्लॅटफॉर्मवर यशस्वीपणे करण्यात आली.

आगामी काळात प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ३०० उत्पादकांची नोंदणी प्रोटिन टेक्नॉलॉजीमार्फत नंदुरबार ई-स्टोअरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या प्रकल्पातून ओएनडीसी प्लॅटफॉर्मवर प्रामुख्याने नाबार्ड, माविम, उमेद, कृषी विज्ञान केंद्र, विविध स्वयंसेवी संस्थांसोबत जुळलेल्या व वैयक्तिक नावीन्यपूर्ण उत्पादन बनविणाऱ्या उत्पादकांचा समावेश करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी खत्री म्हणाल्या, की नंदुरबार जिल्हा हा ओएनडीसी या डिजिटल प्लॅटफॉर्मवर समर्पित ई-स्टोअर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून नोंदणी करणारा देशातील पहिलाच जिल्हा ठरला आहे. बदलत्या काळात डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्मचे महत्त्व लक्षात घेऊन जिल्ह्यातील उत्पादकांनी विशेषत:

बचत गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी ओएनडीसी डिजिटल प्लॅटफॉर्मच्या ‘नंदुरबार ई-मार्केट प्लेस’च्या वापरावर जास्तीत जास्त सहभाग नोंदवून आपल्या उत्पादनाची विक्री करून आपल्या व्यवसायाची वृद्धी करावी. यासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Protest : तात्काळ मदतीची मागणी! दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांचे उद्यापासून बेमुदत उपोषण

Soybean Seed Storage : सोयाबीन बियाणे सुरक्षित ठेवण्यासाठी कृषी तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

Turmeric Crops : हळद उत्पादक शेतकरी हवालदिल! करप्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे हळद पीक आले अडचणीत

Amravati Teachers Constituency : अमरावती शिक्षक निवडणूक: शिक्षकांच्या मतांवर कोणाचा ताबा? मतविभाजन ठरणार निर्णायक

FFS App Fertilizer Booking : खत खरेदी आता झाली डिजिटल; २२ तारखेपासून घरबसल्या करा ऑनलाईन बुकिंग

SCROLL FOR NEXT