Sugarcane News Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Crushing : नगर जिल्ह्यात ५० लाख टनांपेक्षा अधिक ऊस गाळप

यंदा सहकारी १४ व सात खासगी अशा २१ साखर कारखान्यांकडून उसाचे गाळप सुरू आहे. यंदा १ लाख ७३ हजार ०५८ हेक्टरवर गाळपासाठी ऊस उपलब्ध आहे.

Team Agrowon

नगर ः जिल्ह्यात यंदा पावणे दोन लाख टन उसाचे गाळप (sugarcane Crushing) होण्याचा अंदाज आहे. त्यात सर्वाधिक ३९ हजार हेक्टरवर नेवासा तालुक्यात ऊस (Sugarcane) उपलब्ध आहे. यातून सुमारे एक कोटी ४० लाख टनांचे गाळप होईल.

आतापर्यंत ५० लाख टनांपेक्षा अधिक गाळप झाले आहे. नगरच्या प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली.

जिल्ह्यातील उपलब्ध ऊस (हेक्टर)

शेवगाव ः २३०४७, नेवासा ः ३९३९४, पाथर्डी ः ९८७३, श्रीरामपूर ः १०७३४, कोपरगाव ः ८४८७, राहाता ः ३७१३, संगमनेर ः ६१७०, अकोले ः ३२९९, राहुरी ः २४७२९, नगर ः १७००, श्रीगोंदा ः २३९३७, पारनेर ः २७०३, कर्जत ः १११६९, जामखेड ः ४०७४

नाशिकला ३० हजार हेक्टर क्षेत्र

नाशिक जिल्हा नगर प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयांतर्गत येतो. नाशिक जिल्ह्यात ३० हजार ६५ हेक्टर ऊस यंदा गाळपासाठी उपलब्ध आहे. त्यातून २३ लाखांपेक्षा अधिक ऊसगाळप होईल. नाशिक जिल्ह्यात सरासरी हेक्टरी ७४ टन उसाची उत्पादकता निश्‍चित केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

Maharashtra Assembly Election Result 2024 : ‘ते’ पुन्हा आले!

Vidhansabha Election 2024 : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत महायुतीचाच प्रभाव

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT