Agriculture Agrowon
ताज्या बातम्या

Farmer Income : शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे स्रोत बळकट करण्यासाठी सिल्क, मिल्क

Sericulture : याअंतर्गत आलेगाव (ता. पूर्णा) येथे जिल्हा रेशीम विकास कार्यालय व पशुसंवर्धन विभागातर्फे मंगळवारी (ता. ११) तुती लागवड पूर्वप्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

Team Agrowon

Parbhani News : शेतीपूरक रेशीम शेती व दुग्ध व्यवसाय यांची सांगड घालून शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे स्रोत बळकट करण्यासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या संकल्पनेतून परभणी जिल्ह्यातील चुडावा व आलेगाव (ता. पूर्णा) या दोन रेशीम उत्पादक गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सिल्क व मिल्क (रेशीम व दूध) ही संकल्पना राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी गोविंद कदम यांनी दिली.

याअंतर्गत आलेगाव (ता. पूर्णा) येथे जिल्हा रेशीम विकास कार्यालय व पशुसंवर्धन विभागातर्फे मंगळवारी (ता. ११) तुती लागवड पूर्वप्रशिक्षण व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव, जिल्हा रेशीम विकास अधिकारी गोविंद कदम, सहायक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. आर. ए. कल्यापुरे, उदय कुलकर्णी, तंत्र अधिकारी रेशीम कांचन जाधव, डॉ. एस. टी. बुचाले, रेशीम उत्पादक शेतकरी हनुमंत गरडआदी उपस्थित होते.

डॉ. आघाव म्हणाले, की गाई, म्हशी किंवा शेळी संगोपनासाठी तुतीचा उरलेला पाला जनावरांना खाद्य म्हणून दिल्यास प्रथिनयुक्त आहार भेटेल. दुग्ध उत्पादनात वाढ होईल. स्निग्नअंशाचे (फॅट) प्रमाण चांगले येऊन चांगले दर मिळतील.

त्यामुळे शेतकऱ्यांनी रेशीम शेती उद्योग सोबत अतिरिक्त चांगले उत्पन्न मिळू शकेल. कदम म्हणाले, की रेशीम लाभार्थ्यानी दुग्ध व्यवसाय केल्यास वेगळी चारा पिके लावण्याची गरज नाही.

रेशीम कीटकांना संगोपनातून शिल्लक पाने, फांद्या जनावरांना देता येईल. एप्रिल व मे महिन्यांत तापमान अधिक असल्यामुळे रेशीम कोष उत्पादन बंद असते. उन्हाळ्यात चाराटंचाई देखील असते. त्या वेळी पशुधनासाठी चारा म्हणून तुतीच्या पानांचा पर्याय राहील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MGNREGA: ‘राम’भरोशावर रोजगार!

Sudhir Mungantiwar: ज्यांचं अन्न खाता, त्यांच्याशी तरी खोटे बोलू नका; ‘कृषी समृद्धी’वरून सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला घरचा आहेर

Shirur Jambut APMC: जांबूत येथील उपबाजार १५ वर्षांपासून बंद अवस्थेत

Pune Monsoon Rain: पुणे जिल्ह्यात विविध भागांत मॉन्सूनचे दमदार पुनरागमन

Seed Scam: शेतकऱ्यांचे आयुक्तालयाच्या छतावर आंदोलन; धाराशिव निविष्ठा घोटाळा प्रकरण

SCROLL FOR NEXT