Team Agrowon
हाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दरवर्षी एकरी १५ हजार रुपये अनुदान देण्याची मागणी शेतकरी संघटनेने केली आहे.
औरंगाबाद जिल्हाध्यक्ष काशिनाथ हरिभाऊ वेताळ पाटील यांच्या नेतृत्वात याबाबत विभागीय आयुक्तांना सोमवारी (ता. २०) निवेदन देण्यात आले.
श्री वेताळ यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टी व कधी पावसाचा मोठा खंड यासारख्या आपत्तीमुळे दरवर्षी संकटात सापडत आहे.
त्यावरही मात करून कष्टाने पिकविलेल्या शेती मालाला रास्त भाव मिळत नाही.
त्यामुळे घेतलेल्या कर्जाची तो परतफेड कर शकत नाही.
नुकसानीच्या हमीसाठी घेतलेल्या पीक विम्याची रक्कम ही त्याला मिळत नाही.