Onion Storage | onion storage News Agrowon
ताज्या बातम्या

Onion Storage : कांदा साठवणूक पर्यायावर ठोस काम दाखवा ः आहुजा

‘एनएचआरडीएफ’च्या शास्त्रज्ञांना विचारणा

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
नाशिक : कांदा साठवणुकीच्या (Onion Storage ) पद्धती व त्याच्या मॉडेलबाबत गेल्या दहा वर्षांपासून वेगवेगळे संशोधने होत आहे. साठवणूक दरम्यान येणाऱ्या अडचणी त्याच असून, प्रत्येक सादरीकरण करताना वारंवार तेच संशोधन दाखवण्यात येत आहे.

त्यामुळे कांदा साठवणूक करण्यासाठी जे मॉडेल परिणामकारक आहे त्यावर चर्चा करा आणि तेच दाखवा अशी विचारणा केंद्रिय कृषी व शेतकरी मंत्रालयाचे सचिव मनोज आहुजा यांनी ‘एनएचआरडीएफ’च्या शास्त्रज्ञांना केली.

नाशिक दौऱ्यावर आलेले केंद्रिय सचिव यांनी राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास संस्थेला (एनएचआरडीएफ) भेट दिली. या वेळी तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत अतिरिक्त सचिव डॉ. अभिलक्ष लिखी आणि फलोत्पादन आयुक्त प्रभात कुमार उपस्थित होते. संस्थेच्या पाहणीनंतर झालेल्या बैठकीला या वेळी राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठानचे सदस्य संजय होळकर, संचालक डॉ. पी. के. गुप्ता, सहायक संचालक डॉ. आर. सी. गुप्ता, नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील, कांदा व लसूण महासंचालनालयाचे डॉ. विजय महाजन, महाएफपीसीचे योगेश थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.

आहुजा म्हणाले, की एवढे शास्त्रज्ञ असताना काहीतरी सकारात्मक व पारदर्शकतेसाठी काम करण्याची गरज आहे. त्यामुळे बीजोत्पादन कांदा खरेदी, साठवणूक या अनुषंगाने नुकसान कमी करण्यासाठी ठोस पर्याय द्यावा लागणार आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या महासंघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसोबत थेट कांदा खरेदी करार केले. हा माल शेतकऱ्याच्या साठवणूक व्यवस्थेत ठेवल्यास नुकसान कमी करण्यासह पारदर्शकता येईल, यावर सकारात्मक भूमिका मांडली. बियाणे उत्पादन व वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाइन प्रणाली तयार काम करण्याची सूचना त्यांनी केली. त्याअनुषंगाने सुरुवातीपासून काम झाल्यास उत्पादित बियाण्यांचे नमुन्यांच्या तपासणी व चाचण्या प्रयोगशाळेत घेतल्यास गुणवत्ता हमी देणे शक्य होईल.---

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT