Team Agrowon
रोपवाटिका तयार करण्यापुर्वी चांगले कुजलेले अर्धा टन शेणखत जमिनीत मिसळावे. त्याबरोबर ४० किलो निंबोळी खत मिसळावे.
रोपवाटिका तयार करण्यासाठी गादीवाफ्याचा वापर करावा. वाफे १० ते १५ सेंमी उंचीचे, १ मीटर लांब व रुंद वाफे तयार करावेत.
कांदा बियाणे पेरण्यापूर्वी पेंडीमिथॅलीन या तणनाशकाची २ ते ३ मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
बीज प्रक्रियेसाठी थायरम किंवा कार्बेंन्डाझिम या बुरशीनाशकाचा २ ते ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात वापर करावा.
ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक २ लिटर प्रति एकर याप्रमाणे जमिनीत ओल असताना द्यावे.
बियाणे पेरण्यापूर्वी ४ किलो नत्र, १ किलो स्फुरद व १ किलो पोटॅश बियाणे पेरण्याअगोदर जमिनीत टाकावे.