Soybean Seeds Agrowon
ताज्या बातम्या

Soybean Seed : नगर जिल्ह्यात सोयाबीन बियाणांचा तुटवडा

Kharif Season : नगर जिल्ह्यात दरवर्षी साधारणपणे १५ जुलैपर्यंत बऱ्यापैकी खरिपाच्या पेरण्या आणि कापूस लागवड उरकलेली असते. यंदा पाऊस पंधरा ते वीस दिवसांनी उशिरा सुरू झाला.

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यात मागणी असलेल्या फुले संगम या सोयाबीन बियाणांचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून अनुदानावर बियाणे मिळण्यासाठी परमीट मिळूनही बियाणे मिळेनासे झाले आहे. ज्यांच्याकडे हे बियाणे उपलब्ध आहे, तेथे चढ्या दराने विकले जात असल्याच्या तक्रारी आहेत. कृषी विभाग मात्र मुबलक बियाणे उपलब्ध असून ठरावीक वाणांचा शेतकऱ्यांनी आग्रह धरू नये, असे आवाहन करत आहे.

नगर जिल्ह्यात दरवर्षी साधारणपणे १५ जुलैपर्यंत बऱ्यापैकी खरिपाच्या पेरण्या आणि कापूस लागवड उरकलेली असते. यंदा पाऊस पंधरा ते वीस दिवसांनी उशिरा सुरू झाला. त्यामुळे खरिपातील सर्वच पेरण्यांना उशीर होत आहे. उशिराने पाऊस आल्यामुळे मूग, उडदाचे क्षेत्र कमी होऊन त्याजागी कापूस, सोयाबीनचा पेरा वाढणार असा अंदाज आहे.

सध्या खरिपाच्या पेरण्या सुरू आहे. नगर जिल्ह्यात खरिपाचे ५ लाख ८० हजार ५०७ हेक्टर सरासरी क्षेत्र ६ लाख ४९ हजार ७३० हेक्टर क्षेत्र कृषी विभागाने प्रस्तावीक केले आहे. सरासरीपेक्षा सत्तर हजार हेक्टर क्षेत्र जास्ती आहे. बाजरीचे क्षेत्र कमी तर कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडदाचे क्षेत्र वाढणार असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

यंदा सर्वाधिक सोयाबीनचे १,५२,००० हेक्टरवर पेरणीचा अंदाज आहे. त्याअनुषंगाने कृषी विभागाने बियाणांची मागणी केलेली आहे. फुले संगम वाणाला अधिक मागणी आहे. मागणीमुळे विक्रेत्यांनी टंचाई निर्माण केल्याचा काही शेतकऱ्यांचा आरोप आहे.

सोयाबीनचे बियाणे अनुदानावर उपलब्ध करून दिले जात आहेत. त्यासाठी कृषी विभागाकडून फुले संगम बियाणांचे परमीट दिले जात असले तरी बियाणे उपलब्ध नसल्याचे दुकानदार सांगतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT