Shivar Feri Agrowon
ताज्या बातम्या

Shivar Feri : रिसोड तालुक्यात शिवार फेरी

कवठा खुर्द येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत नवीन विहिरीची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

Team Agrowon

रिसोड, जि. वाशीम ः कृषी विभागाच्या (Agriculture Department) वतीने तालुक्यात शिवार फेरीचे (Shivar Feri) आयोजन करण्यात आले. या वेळी कवठा खुर्द येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत नवीन विहिरीची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच कवठा येथे नावीन्यपूर्ण बाब म्हणून मोहगनी वृक्षाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. याची सुद्धा पाहणी करण्यात आली. बाळखेड येथे बाळनाथ शेतकरी उत्पादन कंपनीला भेट देऊन या ठिकाणी सुरू असलेल्या फळ प्रक्रिया उद्योगाची माहिती अधिकाऱ्यांनी घेतली.

या शिवार फेरीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम, जिल्हा कृषी अधिकारी गणेश गिरी, कृषी अधिकारी नितीन जोशी, विस्तार अधिकारी आशिष मुळे आदी सहभागी होते.

केंद्र सरकारकडून देशातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच शेतीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत.

शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक साह्य करण्यात येते.

जेणेकरून शेतकरी आपल्या शेतात आधुनिक तंत्राचा वापर करून आपले उत्पन्न वाढवू शकतील. या योजनेअंतर्गत बांधलेल्या नवीन विहिरीची पाहणी करण्यात आली तसेच कवठा या ठिकाणी शेतकऱ्यांनी मोहगनी वृक्षाची लागवड झालेली असून, या लागवडीची सुद्धा पाहणी करण्यात आली. बाळखेड येथे फळ प्रक्रिया उद्योगाची माहिती घेतली.

सुनील निकम यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांबद्दल माहिती दिली. या शिवार फेरीमुळे कवठा व बाळखेड येथील शेतकरी सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT