Ghodganga Sugar Factory
Ghodganga Sugar Factory  Agrowon
ताज्या बातम्या

Ghodganga Sugar Factory : घोडगंगा कारखान्यासमोर शेतकरी संघटना आंदोलन करणार

Team Agrowon

Ghodganga Sugar Factory न्हावरे, ता. शिरूर ः येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याने ऊस ऊत्पादक शेतकऱ्यांचे (Sugarcane Farmer) नुकत्याच पार पडलेल्या गळीत हंगामातील (Sugarcane Crushing Seascon) एफआरपीनुसार (Sugarcane FRP) उर्वरित थकित बिल तातडीने जमा करावीत, अन्यथा सोमवारी (१ मे) कारखान्यासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र ढमढेरे व इतर पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे कारखाना प्रशासनाला दिला आहे.

शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य शिरूर तालुका यांच्या वतीने कारखान्याचे कार्यकारी संचालकाना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कारखान्याने सन २०२२-२०२३ या कालावधीत गळितासाठी नेलेल्या शेतकऱ्यांचे उसाचे बिल थकित आहे.

ते तातडीने जमा करावीत १५ जानेवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान गळितासाठी गेलेल्या उसाचे बिल २ हजार रुपये प्रतिटन याप्रमाणे जमा केले असून, उर्वरित बिलाची रक्कम तातडीने जमा करावी.

६ फेब्रुवारी ते ६ मार्चपर्यंतची संपूर्ण रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांचे सुमारे वर्षभरापासून पगार थकले आहेत ते तत्काळ जमा करावेत. कामगारांचे पगार थकल्याने विमा पॉलिसीचे हप्तेही बंद पडले आहेत.

एखाद्या कामगाराचा अपघात झाल्यास त्याला अपघात विमा रक्कम मिळण्यास अडचण होत आहे, तरी विमा पॉलिसीचे हप्ते सुरळीत भरावेत त्याचबरोबर ऊसतोड तसेच ऊसवाहतूक कंत्राटदारांची उर्वरित मस्टर बिले द्यावीत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

वरील सर्व मागण्यांची तातडीने पूर्तता करावी अन्यथा येत्या १ मे रोजी कारखान्यासमोर बोंबाबोंब आंदोलन केले जाईल, असा इशारा कारखाना प्रशासनाला निवेदनात दिला आहे. या वेळी अध्यक्ष राजेंद्र ढमढेरे यांच्या बरोबर सुनील ढमढेरे, दिलीप खैरे, रामभाऊ जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. याबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क झाला नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Brazil Flood : ब्राझीलमध्ये पुरामुळे ५६ लोकांचा मृत्यू

Shirur Lok Sabha : शेती, बेरोजगारी, वाहतूकप्रश्‍न ‘जैसे थे’

Sugarcane FRP : ‘सोमेश्वर’चा शंभर रुपयांचा दुसरा हप्ता आज देणार

Sugar Industry : साखर उद्योग प्राप्तिकरातून मुक्त केला ः पाटील

Onion Rate : कांद्याचे बाजार शुल्क घटवले एक रुपयावरून ५० पैशांवर

SCROLL FOR NEXT