Fodder Shortage  Agrowon
ताज्या बातम्या

Fodder Shortage : मेंढपाळ कुटूंबियांची चारा, पाण्याच्या शोधात भटकंती

Water Crisis : नैऋत्य मोसमी पावसाने दडी मारल्याने पिण्याचे पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Team Agrowon

Nira Narsinhpur News : नैऋत्य मोसमी पावसाने दडी मारल्याने पिण्याचे पाणी व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मेंढपाळ आपल्या मेंढ्या, त्याची पिल्ले, कुटूंबातील सदस्यांच्या जेवणाचे साहित्य, पाळीव कुत्रे, कोंबड्या घोड्यांच्या पाठीवर लादून चारा व पाण्याच्या शोधात भटकंती करत फिरत असल्याची स्थिती आहे.

पावसाळा संपताच घरातील वयोवृद्ध व्यक्तींच्या जेवण, पाण्याची सोय करून मेंढपाळ कुटुंबं मेंढ्यांच्या चारा, पाण्याच्या शोधात शेकडो मैल पायपीट करत जातात.

परंतू यावर्षी पावसाने सुरूवातीपासूनच दांडी मारल्याने हजारो मैल भटकंतीवर गेलेल्या मेंढपाळ कुटूंबियांवर पुन्हा घराचा रस्ता विसरण्याची वेळ आली आहे. कारण मेंढ्या जगविण्यासाठी पुन्हा विदर्भ, मराठवाड्याकडे निघावे लागले आहे.

सध्याला घराजवळ येऊन पुन्हा घरच्यांना विसरून चारा पाण्याच्या शोधात जावे लागत असल्याने घरातील वयोवृद्ध व्यक्तींना गहिवरून आले होते.

परंतु कुटुंबियांपेक्षा मुक्या प्राण्यांचा जीव महत्त्वाचा मानून घोड्याच्या पाठीवर संसार उपयोगी साहित्य लादून ते शेकडो मैलांच्या प्रवासासाठी निघाले आहेत. सलग दुसऱ्या वर्षीची दिवाळी घरापासून दूर साजरी करण्याची वेळ मेंढपाळ कुटुंबांवर आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT