sharad pawar agrowon
ताज्या बातम्या

Opposition Meeting: विरोधकांच्या बैठकीसाठी शरद पवार बंगळुरुमध्ये दाखल

Bengaluru Opposition Meeting : आगामी निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. तर देशभरात भाजपविरोधी पक्षांनी एकत्रित येत लढण्यासाठी विरोधी पक्षांचे प्रयत्न सुरु केले आहेत. बंगळुरुतील बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सहभागी झाले आहेत.

Team Agrowon

sharad pawar Bengaluru : आगामी लोकसभा निवडणुकांच्या भाजपविरोधी पक्षांची मोट बांधणी सुरू झाली. पाटणानंतर दुसरी बैठक आज बंगळुरुमध्ये होत आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सहभागी झाले.

एकीकडे भाजप विरोधी पक्ष एकत्रित येत आहेत तर दुसरीकडे भाजपकडून दिल्लीत एनडीएच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीला देशभरातील 26 पक्ष हजेरी लावणार आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणूकीवर रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. भाजप विरोधकांच्या आज बुंगळुरुमध्ये होणाऱ्या बैठकीसाठी महाराष्ट्रातून ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत हे काल बंगलुरूमध्ये पोहोचले. आज शरद पवार बंगलुरूमध्ये दाखल झाले. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत जागावाटपाचा नेमका फॉर्म्युला काय असावा, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, आपचे अरविंद केजरीवाल, पिडीपीच्या महेबुबा मुफ्ती, सपाचे अखिलेश यादव, तृणमुल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी, राजदचे लालूप्रसाद यादव, जेडेयुचे नितीश कुमार यांच्यासह अनेक पक्षांचे नेते बैठकीला उपस्थित आहेत.

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मात्र बैठकीला हजेरी लावलेली नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

Citrus Spider Mite Infestation: लिंबूवर्गीय पिकांवरील जाळी-विणणारा कोळी

Maratha Reservation Protest: मनोज जरांगेंचा मराठा मोर्चा १९ सप्टेंबरला मंुबईत धडकणार

SCROLL FOR NEXT