E Peek Pahani Agrowon
ताज्या बातम्या

E Peek Pahani : ई-पीकपाहणीच्या नोंदणीत ‘सर्व्हर डाउन’ची अडचण

Kharif Crop Registration : शेतपीकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई-पीक नोंदणी केली जात आहे. मात्र गेल्‍या काही दिवसांपासून सर्व्हर डाउन होत असल्याने शेतकऱ्याना अडचणीला सामोरे जावे लागले आहे.

Team Agrowon

Nagar News : शेतपीकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई-पीक नोंदणी केली जात आहे. मात्र गेल्‍या काही दिवसांपासून सर्व्हर डाउन होत असल्याने शेतकऱ्याना अडचणीला सामोरे जावे लागले आहे.

१५ ऑक्टोबरपर्यंत ही नोंदणी करून घ्यायची आहे. जिल्‍ह्यात आतापर्यंत १४ लाख २३ हजार ७५९ शेतकऱ्यांपैकी ३ लाख ७८ हजार ७११ शेतकऱ्यांनी ४ लाख २० हजार २६२ हेक्टरवर पीक नोंदणी झाली आहे. मात्र ई-पीक पाहणीच्या ॲपचे सर्व्हर डाउनमुळे ई-पीक नोंदणीत अडचणी येत आहेत.

जिल्ह्यात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ई-पीक नोंदणी करावी, यासाठी प्रशासनाने सातत्याने आवाहन केले आहे. ई-पीक नोंदणीची १५ ऑक्टोबर अंतिम तारीख आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत ही नोंदणी करण्यासाठी अडचणी येत आहेत.

शेतकऱ्यांनी ॲपवर स्वतःच्या मोबाइलमधून नोंदणी करण्याचे सांगण्यात आले. खरिपातील विविध पिकांच्या पेरणी क्षेत्राची योग्य आकडेवारी प्रशासनाकडे उपलब्ध व्हावा.

त्यानुसार शासनास धोरणे ठरविता यावीत. त्यासाठी ई-पीकपाहणी प्रकल्प राबविला जात आहे. ई-पीक ॲपमध्ये विविध सलग तसेच मिश्र पिकांची नोंद करण्याविषयी शेतकऱ्यांना माहिती नाही. त्यात इंटरनेट कनेक्टिव्हिटी‌ होत नाही. त्यामुळे पीक नोंदणी करण्याला सर्व्हर डाउनमुळे अडचणी येत आहेत. ‘‘शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी तलाठी, सहायकांना बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदत करण्यास सांगितले.

मुदतवाढीची मागणी

जिल्ह्यात यंदा सहा लाख ६६ हजार ३७९ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. पीक नोंदणीसाठी १४ लाख २३ हजार ७५९ खातेदार आहेत. त्यापैकी ३ लाख ७८ हजार ७११ शेतकऱ्यांनी ४ लाख २० हजार २५२ हेक्टरवर पीक नोंदणी केली आहे. काही भागात ‘सर्व्हर डाऊन’ची अडचण अडचण असल्याने शेतकरी वंचित राहू नयेत म्हणून मुदतवाढीचीही मागणी केली जात आहे.

मागील काळात पीक नोंदणी करताना अडचणी येत होत्या. आता ‘सर्व्हर’ चांगले चालते, शिवाय आमच्या गावात तलाठी शेतात येऊन अडचणी सोडवत असल्याने शेतकऱ्यांना मदत होत आहे.
- रामदास अडसुरे, शेतकरी, निमगाव वाघा, ता. नगर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mung Urid Threshing: मूग आणि उडीदाची मळणी करताना काय काळजी घ्यावी?

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीमध्ये धोरणात्मक निर्णय घेऊ नका: उच्च न्यायालय

Farmer Payment: कांदा खरेदीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

Turmeric Disease: हळदीवर कंदकुज रोगाचा धोका, नियंत्रणासाठी सोपे मार्गदर्शक उपाय

Cooperative Commissionerate: सावकारांनो, कर्ज देताना व्याजदराचा फलक लावा: सहकार आयुक्तालय

SCROLL FOR NEXT