Agriculture Award
Agriculture Award Agrowon
ताज्या बातम्या

‘वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावे’

टीम ॲग्रोवन

पुसद, जि. यवतमाळ ः हरितक्रांतीचे (Green Revolution) प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या स्मृतिदिनी दरवर्षी १८ ऑगस्ट रोजी विक्रमी उत्पादन (Record Production) घेणाऱ्या निवडक कर्तबगार शेतकऱ्यांचा तसेच कृषी शास्त्रज्ञांचा शाल, श्रीफळ, स्मृतिमानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्याची पुसद येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानची दीर्घ परंपरा आहे. (Agriculture Award)

त्यानिमित्त वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव संपूर्ण महाराष्ट्रातून बोलविण्यात येत आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश व कोकण अशा विभागातून विभागनिहाय शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत विविध प्रयोग करून विक्रमी उत्पादन आणि अधिक नफा प्राप्त केला असल्यास आपला जीवनालेख (बायोडाटा) पाठवावा. त्यामध्ये खर्च किती, उत्पादन (टनामध्ये) किती व बाजारपेठेत विक्री केल्यानंतर किती निव्वळ नफा झाला याची सविस्तर माहिती द्यावी. तसेच या वर्षी शास्त्रज्ञांसाठी ‘तेलबिया (सोयाबीन, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, मोहरी) उत्पादन वाढीसाठी केलेल्या विशेष संशोधनात्मक कार्यासाठी’ हा विषय निवडला आहे. ज्यांनी तेलबिया पिकामध्ये संशोधन करून नवीन जातीच्या बियाण्यांची निर्मिती केली असेल व त्यावर प्रात्यक्षिक करून अधिक उत्पादन घेतले असेल अशाच शास्त्रज्ञांनी त्यांचा जीवनालेख (बायोडाटा) आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा, शास्त्रज्ञांसाठी दुसरा विषय ‘हळद प्रक्रिया उद्योग’ यावर विशेष संशोधनात्मक कार्यासाठी हा विषय निवडला आहे. संबंधित शास्त्रज्ञांनी त्यांचा जीवनालेख (बायोडाटा) आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा.

कृषी क्षेत्राशी संबंधित विशेष पुरस्कार

अ) कृषी क्षेत्रामध्ये विशेष कार्य करणारी शेतकरी उत्पादक कंपनी

ब) जोड व्यवसायातून कृषी पर्यटन विषयावर कार्य करणाऱ्या शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी देखील सविस्तर माहितीसह प्रस्ताव पाठवावा. आपले प्रस्ताव २ पासपोर्ट फोटोसह ता. २५ जुलै पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठविण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत आहे.

पत्र व्यवहाराचा पत्ता : कृषिभूषण दीपक आसेगांवकर, अध्यक्ष, वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान, पुसद. श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयासमोर, पुसद- ४४५ २०४, जि. यवतमाळ

- भ्रमणध्वनी- दीपक आसेगावकर- ९९२२७५२२२२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drip Irrigation : ठिबक सिंचनासाठी ‘जीएसआय’ प्रणालीचा वापर

Agriculture Success Story : हवामान बदलाला सुसंगत शेती वरकड बंधूंची...

Rice Research : ‘बी१’ जीवनसत्त्व अधिक असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

SCROLL FOR NEXT