Fertilizer  Agrowon
ताज्या बातम्या

Fertilizer : विक्रेत्यांना मिळणार दुकान पोहोच खत

खत कंपन्यांकडून खत विक्रेत्यांना खताचा पुरवठा केला जातो. परंतु असे करीत असताना हमाली आणि वाहतूक खर्चाचा भार विक्रेत्यांना सोसावा लागत होता.

टीम ॲग्रोवन

नागपूर ः रासायनिक खत विक्रेत्यांना (Chemical Fertilizer) खताचा पुरवठा (Fertilizer Supply) त्यांच्या दुकानापर्यंत व्हावा, अशी मागणी महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन (Maharashtra Fertilizers Pesticide Seeds Dealers Association) (माफदा)कडून करण्यात आली होती. राज्य गुणनियंत्रण विभागाने ही मागणी मान्य करीत त्याबाबत राज्यातील सर्व खत व्यवस्थापकांनाही कळविले आहे.

खत कंपन्यांकडून खत विक्रेत्यांना खताचा पुरवठा केला जातो. परंतु असे करीत असताना हमाली आणि वाहतूक खर्चाचा भार विक्रेत्यांना सोसावा लागत होता. खत विक्रेत्यांकडून याची वसुली शेतकऱ्यांकडून होत होती. त्यामुळे खताच्या पोत्यावर नमूद असलेल्या किरकोळ विक्री किमतीपेक्षा अधिक किंमत खत विक्रेते आकारत होते. छापील किमतीपेक्षा अधिक रक्‍कम घेतली जात असल्याने विक्रेते आणि शेतकऱ्यांमध्ये अनेकदा वादाचे प्रकार घडले. जादा दर आकारत असल्याबाबत कृषी विभागाकडे तक्रारी झाल्या आणि त्याची दखल घेत विक्रेत्यांवर परवाने निलंबन, रद्दची कारवाई करण्यात आली. यामुळे खत विक्रेते जेरीस आले होते. कंपन्यांकडून खत विक्रेत्यांना दुकानापर्यंत (फॉर) पुरवठा व्हावा, अशी मागणी निवेदनाद्वारे व प्रत्यक्ष घेण्यात आलेल्या बैठकीत मांडण्यात आली.

या मागणीची सकारात्मक दखल घेत खत विक्रेत्यांना आता दुकानापर्यंत पोहोच मिळणार आहे. राज्य खत व्यवस्थापक यांना या संबंधीचे निर्देश गुणनियंत्रण संचालक दिलीप झेंडे यांच्याकडून मंगळवारी (ता. २६) एका पत्रान्वये देण्यात आले. माफदाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

गुणनियंत्रक संचालकांच्या पत्रात नमूद

या मागणीची सकारात्मक दखल घेत खत विक्रेत्यांना आता दुकानापर्यंत पोहोच मिळणार आहे. राज्य खत व्यवस्थापक यांना या संबंधीचे निर्देश गुणनियंत्रण संचालक दिलीप झेंडे यांच्याकडून मंगळवारी (ता. २६) एका पत्रान्वये देण्यात आले. माफदाने या निर्णयाचे स्वागत केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Re-Sowing: दुबार पेरणीसाठी सरकार शेतकऱ्यांना मदत देणार, राज्य सरकारचा निर्णय, मंत्री बावनकुळेंची माहिती

Pandharpur Cycle Wari: पंढरपुरात रंगली ४ हजार सायकलस्वारांची आगळीवेगळी ‘सायकल वारी’

Kharif Sowing Delayed: पावसाच्या खंडामुळे खरिपाच्या पेरण्यांना ‘ब्रेक’

Farm Loan Waiver Scheme: लाखभर शेतकऱ्यांचा कोरा होणार ७/१२

Re Sowing Kharif: दुबार पेरणी करताना कोणती काळजी घ्यावी?

SCROLL FOR NEXT