Sustainable Agriculture  Agrowon
ताज्या बातम्या

Sustainable Agriculture : शाश्वत शेती तंत्रज्ञानासाठी यावलखेड, वरोडी, सांगळूद, धोतर्डी गावांची निवड

हवामानानुकूल तसेच कमी खर्चाची शेती करण्यासाठी शाश्वत तंत्रज्ञान राबवण्याच्या उद्देशाने येथील सेवाधर्म शिक्षण व बहुउद्देशीय संस्थेने जिल्ह्यातील यावलखेड, वरोडी, सांगळूद व धोतर्डी या चार गावांची निवड केली.

टीम ॲग्रोवन

अकोला : हवामानानुकूल तसेच कमी खर्चाची शेती (Low Cost Agriculture) करण्यासाठी शाश्वत तंत्रज्ञान (Sustainable Agriculture) राबवण्याच्या उद्देशाने येथील सेवाधर्म शिक्षण व बहुउद्देशीय संस्थेने जिल्ह्यातील यावलखेड, वरोडी, सांगळूद व धोतर्डी या चार गावांची निवड केली.

अफार्मचे अध्यक्ष प्रमोद देशमुख, कार्यकारी संचालक सुभाष तांबोळी, प्रकल्प संचालक एस. एन. साकोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सप्टेंबर २०२४ पर्यंत राबवण्यात येणार आहे. यासाठी सेवाधर्म संस्थेचे अध्यक्ष प्रा. धनंजय कोठाले व सचिव तुषार हांडे यांच्यासह संचालक काम करीत आहेत.

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ७० टक्के नागरिकांची उपजीविका शेती व शेती संलग्न व्यवसायांवर अवलंबून आहे. कमी झालेली उत्पादकता, एक पीक पद्धतीचा वापर, उत्पादन खर्चातील वाढ, अपुरा व त्रोटक वित्त पुरवठा, काढणीपश्चात प्रक्रिया व कृषी माल मूल्यवर्धनाचा, शेतीतील व्यावसायिकतेचा अभाव, बाजार भावातील अनिश्चितता, शेतीला जोडधंद्याचा अभाव अशा विविध कारणांमुळे शेती व शेती संलग्न व्यवसाय किफायतशीर होताना दिसत नाहीत.

पर्यायाने ग्रामीण कुटुंबातील नवी पिढी कृषी व्यवसायामधून बाहेर पडून बिगरशेती रोजगाराशी संबंधित संधीच्या शोधात शहरांकडे वळताना दिसून येते. या दृष्टीने लहान व अल्प भूधारक, अदिवासी महिला शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून ग्रामीण कुटुंबाची उपजीविका सक्षम करण्यासाठी अफार्ममार्फत हवामान अनुकूल शेती एकात्मिक कृषी प्रणाली मजबूतीकरण व कृषी उद्योजकता विकास इत्यादी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतीचे उत्पन्न वाढीसाठी बदलत्या हवामानानुसार, कमी खर्चात जास्त उत्पादन मिळविण्यासाठी जमिनीतील ओलावा संवर्धन पद्धती, मातीचे आरोग्य सुधारण्यास मदत, स्थानिक वनस्पती संरक्षण उपाय, एकात्मिक पोषक आणि कीटक व्यवस्थापन, सेंद्रीय शेतीसाठी पशुधन संगोपनाची गरज आदी प्रमुख विषयावर ॲक्शन फॉर ॲग्रिकल्चर रिन्युवल इन महाराष्ट्र (अफार्म) पुणेच्या माध्यमातून राज्यात कोरडवाहू जिल्ह्यात हा प्रकल्प राबविण्यात येत आहे, अशी माहिती तुषार हांडे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Farming: एकात्मिक दुग्धव्यवसायातून पशूसखी होताहेत सक्षम

Agriculture Success Story: ज्योतीताईंनी शोधल्या प्रगतीच्या वाटा

Weekly Weather: राज्यात सौम्य थंडीची शक्यता

Farmer Loan Waiver: द्राक्ष उत्पादकांची संपूर्ण कर्जमाफी करा

Crop Insurance Issue: बटाट्याचे क्षेत्र वाढूनही पीकविम्यात समावेश नाही

SCROLL FOR NEXT